Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे धारदार हत्यारासह जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक 

धारदार हत्यारासह जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक 

Subscribe

रात्रीच्यावेळी शहरातील कारखान्यातून बाहेर पडलेला कामगार तसेच खाणावळ, हॉटेल,सुलभ शौचालय  मालकांना धारदार चाकूचा आणि पिस्टलचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या खबर नुसार शांतीनगर रोडवरील आशा कंपाऊंडमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी नौशाद उर्फ आतिक हलीम अन्सारी (४४), इम्रार अख्तर सय्यद (४०), रोशन अली बरकत अली (४०) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे तिघे मुळचे उत्तर प्रदेश मधील राहणारे असून ते भिवंडीत फातमानगर येथे राहत आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून  २ गावठी बनावटीचे अग्निशास्रे,५ जिवंत काडतूस,९ धारदार सुरे व १५ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ७० गाजराचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे तिघे संगनमताने व्यावसायिक लोकांना दुखापत करून व धाक दाखवून त्यांच्याकडे जबरी चोरी करीत होते.अशा प्रकारच्या तक्रारी शांतीनगर पोलीस ठाण्यात ६, निजामपूर आणि शहर पोलीस ठाणे मध्ये प्रत्येकी एक असे आठ गुन्हे दाखल असून त्यापैकी ४ गुन्ह्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. त्यांना भिवंडी न्यायालयात दाखल केले असता ४ मे पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -