घरठाणेपोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मुंब्रा खाडीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मुंब्रा खाडीत बुडून मृत्यू

Subscribe

पाण्याचा अंदाज न आल्याने तीन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू

खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या काही मुलांपैकी तिघे जण बुडल्याची घटना बुधवारी रात्री मुंब्रा येथे समोर आली. या घटनेत रात्री उशिरा दोघांचा शोध घेतल्यानंतर भरती सुरू झाल्याने ती शोध मोहीम थांबविण्यात आली. तसेच गुरुवारी सकाळी शोध मोहीम सुरू केल्यावर पाच ते सहा तासांनी आणखी एक जण दुपारी मिळून आला. त्या तिघांचे पार्थिव शरीर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. त्यानंतर पोलिसांमार्फत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ती मुले कोळीवाडा परिसरातील असून तिघे १६ वर्षीय मुले आहेत. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या जलदगतीच्या ट्रक जवळ, मुंब्रा येथील मुंब्रा खाडीमध्ये पोहण्यासाठी काही मुले गेली होती. त्यातील गेलेले तीन मुले खाडीमध्ये बुडाल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान,कक्षाचे अधिकारी- कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तातडीने शोधमोहिम सुरू झाली. यामध्ये रात्री  १- रेस्क्युव वाहन व १-रूग्नवाहीका इत्यादीसह उपस्थित होते. तीन मुलांपैकी दाऊद अकबर सेलाफी (१६) आणि मोहीम (१६) या दोघांना खाडीमधून बाहेर काढण्यात आले होते.

 

- Advertisement -

याचदरम्यान खाडीमध्ये भरतीची वेळ असल्यामुळे घटनास्थळी शोधमोहीम थांबण्यात आली. त्यांनतर गुरुवारी सकाळी०६:४५ वाजण्याच्या पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आल्यावर  दुपारी १२:१५ वाजण्याच्या दरम्यान गुड्डू वझेर शहा (१६) या मुलाचा मृतदेह तेथील स्थानिक रहिवासीना मुंब्रा नारायण नगर येथील ज्योती इमारत मागील खाडीमध्ये सापडला. त्या तीनही मुलांचे मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यावेळी १ रेस्क्यू वाहन आणि १ रुग्णवाहिका  घटनास्थळी पाचारण केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -