घरठाणेनौपाड्यातील इमारत दुर्घटनेतील जखमी कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून तीन लाखांची मदत

नौपाड्यातील इमारत दुर्घटनेतील जखमी कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून तीन लाखांची मदत

Subscribe

नौपाडा येथील भास्कर कॉलनी मधील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब सोमवारी कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत विजया मोहन सुर्यवंशी, त्यांची दोन मुले प्रथमेश व अथर्व सूर्यवंशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमीची विचारपूस करत उपचारामध्ये कोणतीही हयगय होणार नाही अशा सूचना देवून या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत दिली. ही मदत शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी विजया सूर्यवंशी यांच्याकडे बुधवार १७ मे रोजी सुपुर्द केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्याकडे लक्ष असून या दुर्घटनेचे वृत्त समजताच त्यांनी तातडीने या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. सूर्यवंशी कुटुंबाला उपचारासाठी त्यांनी आज तीन लाख रुपयांची मदत देवून आर्थिक सहकार्य केले. शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेवून सदरची मदत सुपुर्द केली. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच अमर टॉवर सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अमर टॉवर इमारतीच्या दुर्घटनेचे वृत्त समजताच शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य सुरू केले तसेच सूर्यवंशी कुटुंबातील जखमींना नौपाड्यातील पराडकर रुग्णालय व कौशल्य रुग्णालय येथे दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असून विजया सूर्यवंशी यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज या दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. ती इमारत ही २५ वर्षे जुनी असून या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करुन घेण्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले. तसेच या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने रहिवाशांना दिले.

- Advertisement -

” अमर टॉवर इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी जावून पाहणी केली. मात्र सर्वात प्रथम शिवसेनेने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले व या दुर्घटनेत जखमी झालेल्या सूर्यवंशी कुटुंबातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संपर्क साधून जखमींची विचारपूस केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी ठाण्यात नसले तरी त्यांचे ठाण्यावर संपूर्ण लक्ष असून जखमी व्यक्तींच्या उपचारात हयगय होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगितले. मुख्यमंत्र्यांमार्फत करण्यात आलेली तीन लाख रुपयांची मदत विजया सुर्यवंशी यांची मुलगी प्रियांका सुर्यवंशी यांच्याकडे सुपुर्द केली असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे आभार व्यक्त केले आहेत.”

– नरेश म्हस्के, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा प्रवक्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -