घरठाणेठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी तीन रस्ते 'या' वेळेत वाहतूकीसाठी बंद

ठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी तीन रस्ते ‘या’ वेळेत वाहतूकीसाठी बंद

Subscribe

सकाळी ५ ते ७ दरम्यान वाहनांना प्रवेश बंदी

स्वच्छ सुंदर ठाण्यातील ठाणेकरांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ठाणे वाहतुक विभागाने अभिनव निर्णय घेतला आहे. कारण ठाणेकरांना भयमुक्त वातावरणात मॉर्निग वॉक करता यावे यासाठी वाहतूक विभागाने तीन प्रमुख रस्तांवरील वाहतूक सकाळच्या वेळेस बंद केली आहे. त्यामुळे ‘मॉर्निंग वॉकर्स’साठी सकाळी पाच ते सात या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद असणार आहे. आजसूनच या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे ठाणेकरांना अपघात, सोनसाखळी चोरांची भीती न बाळगता मॉर्निंग वॉक करता येणार आहे. मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर पडणाऱ्या ठाणेकरांसाठी ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने ठाण्यातील तीन प्रमुख रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर पहाटे ५ ते ७ या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर सुरू केला आहे. ठाण्यातील तीन हात नाका ते धर्मवीर नाका या दरम्यान असणारा सर्व्हिस रोड, ते उपवन आणि मेसा मुंडा नाका ते हिरानंदानी रोड या तीन रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर लावण्यात येणार आहे. या तिन्ही मार्गावरील रस्त्यावर वाहनाना पहाटे पाच ते सात दरम्यान पूर्णपणे प्रवेश बंदी असेल अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

तसेच ठाण्यात वाढत्या वाहनांची संख्या त्यात मॉर्निग वॉकर आणि जोगर्सची संख्या वाढली आहे. तसेच सोनसाखळी चोरापासून बचाव होण्यासाठी मॉर्निग वॉकरच्या सुरक्षिततेच्या दृष्टकोणातून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -