Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी

भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी

Related Story

- Advertisement -

भिवंडीत शुक्रवारी सायंकाळी धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू उर्फ रणछोड प्रजापती (५०), भगवान मामा ( ५५ ), मनसुख भाई (४५) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत.

भिवंडी शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाऊंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता. कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता आणि कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरू होते. यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती. त्यावर काम केले जात होते.

- Advertisement -

मात्र, हे काम सुरू असतानाच लोखंडी अँगल आणि पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली. त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल आणि पत्रा देखील खाली कोसळला. या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -