घरठाणेकळव्यात धावत्या लोकलवर भिरकावला दगड; एक प्रवासी जखमी

कळव्यात धावत्या लोकलवर भिरकावला दगड; एक प्रवासी जखमी

Subscribe

ठाणे – मध्य रेल्वेच्या धीम्या गती मार्गावरील कल्याणकडे जाणाऱ्या लोकलवर अनोळखी इसमाने दगड भिकावल्याची घटना सोमवारी रात्री कळवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेत कळव्यातील बालचंद गुप्ता(३५) जखमी झाले असून त्यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दगड भिरकावणाऱ्या अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – बहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या लाखो रुपयांवर भावाने मारला डल्ला

- Advertisement -

ठाण्याकडे कल्याणच्या दिशेला चाललेल्या धीम्या लोकलवर सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकादरम्यान दगड भिरकावला. यामध्ये कळवा रेल्वे स्थानकात उतरण्यासाठी दरवाज्यात उभे असणारे कळवा पूर्व शांतीनगर येथील बालचंद गुप्ता (35) यांच्या नाकाला तो दगड लागला असून ते जखमी झाले आहेत. गुप्ता यांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – फ्री वे आता थेट ठाणे घोडबंदरपर्यंत, एमएमआरडीए करणार विस्तार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- Advertisement -

“या घटनेचा दुजारो देताना, नेमके कशामुळे दुखापत झाली हे स्पष्ट झाले नाही. पण, दगड फेकल्याची शक्यता असल्याने दगड फेकणाऱ्या अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. तसेच झालेली दुखापत किरकोळ आहे, अशी माहिती ठाणे लोहमार्गाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

पुन्हा उभी राहणार मोहीम

काही वर्षांपूर्वी दगडफेकीच्या घटना ठाणे व कळवा दरम्यान जलदगती मार्गावर मोठ्या प्रमाणात घडत होत्या, त्यामध्ये काही महिलांना गंभीररित्या दुखापत होत होती. त्याची दखल घेऊन रेल्वे पोलीस व शिवसेनेच्या वतीने कारवाई करुन त्याला आळा बसला होता. आताही पोलीस व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने दगड फेकणाऱ्या समाजकंटकांविरोधात आजपासून मोहिम राबविण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – बाबो! समुद्र किनाऱ्यावर आढळला १०० किलोंचा मासा; मांस पौष्टिक, पण काटे विषारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -