घरठाणेटिटवाळा पोलीस स्टेशनला लॉकअप नाही

टिटवाळा पोलीस स्टेशनला लॉकअप नाही

Subscribe

शहर पोलीस स्टेशनचे कस्टडी गज वाकवून आरोपी फरार

कल्याण तालुक्यातील ६७ गावांचा कायदा व सुव्यवस्थेचा कारभार हाकणाऱ्या टिटवाळा पोलीस स्टेशनला स्वतःचे कस्टडी लॉकअप नसल्याने दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवलेल्या आरोपीने हात सफाईने गज वाकवून पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी त्याचा पाठलाग करूनही अंधाराचा फायदा घेत निसटल्याने गुरुवारी मात्र पोलिसांनी शहापूर तालुक्यातील खर्डी या गावात लपून बसलेल्या या आरोपीच्या अखेर मुस्क्या आवळण्यात यश संपादन केले आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक परीक्षेत्रात कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकसंख्येचा वाढता पसारा असून अनेक नवनवीन गृह संकुलने उभी राहत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने 67 गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न रामभरोसे चालत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकरण ,नवे गृह संकुलने झपाट्याने वाढीस लागल्याने अत्यल्प असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवणे जिकरीचे होऊन बसले आहे.

कल्याण तालुका ग्रामीण भागातील एकीकडे वाढत चाललेल्या गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. कल्याण तालुका पोलीस स्टेशनला गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी लॉकअप नसल्याने टिटवाळाहून किमान 12 ते 13 किलोमीटर असणाऱ्या ठाणे पोलीस कमिशनरच्या हद्दीतील कल्याणातील एम एफ सी पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये घेऊन यावे लागते. गुन्हेगारांना लॉकअप मध्ये ठेवण्यासाठी रेल्वे मार्गाने तर पोलीस व्हॅन किंवा रिक्षाने घेऊन जावे लागते. टिटवाळा ते कल्याण लांबचा पल्ला असल्याने यामध्ये गुन्हेगार निसटून जाण्याची शक्यता अधिक असते. कल्याण तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरीत राम सखाराम काकड या सराईत चोरट्यास अटक करीत कल्याणातील एम एफ सी पोलीस ठाण्यात लॉकअप मध्ये बंद केले होते. लॉकअप बाहेर पोलिसांचा पहारा असतानाही या चोरट्याने बुधवारी पहाटे तीनच्या दरम्यान लॉकअपचे गज वाकवून पोलिसांच्या नजर कैदेतून पळाला. लॉकअप बाहेर पहारा देणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला. कल्याण तालुका पोलीस स्टेशनला स्वतःचे लॉकअप नसल्याने ही घटना घडली असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने लॉकअप ची गरज या पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देतील काय? असा सवाल टिटवाळ्यातील राजकीय ,सामाजिक व विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -