घरक्राइमTitwala : ऐन दिवाळीत टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरात महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

Titwala : ऐन दिवाळीत टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरात महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

Subscribe

टिटवाळा : मुंबईतही महिला सुरक्षित नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी (13 नोव्हेंबर) रात्री उशिरा महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांना तत्काळ अटक केली आहे. (Woman raped in Titwala railway station area during Diwali The accused was arrested)

हेही वाचा – कदम-कीर्तिकरांच्या वादाने ओलांडल्या सर्व मर्यादा; गजाभाऊंच्या बायकोचाही उल्लेख

- Advertisement -

पीडित महिला टिटवाळा स्थानकात उतरल्यानंतर ट्रॅकमधून चालत तिच्या घरी जात होती. यावेळी आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. टिटवाळा स्टेशन परिसरात हा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी अटक केली असन पुढील तपास करत असल्याची माहीती एसीपी मनोज पाटील यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शहाडमध्ये एका खासगी कंपनीत काम करते. ती सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास महिला शहाड रेल्वे स्थानकावरुन कामवरून परताना लोकलने टिटवाळा स्थानकात उतरली आणि बाजूलाच असलेल्या रेल्वे रुळावरून पीडिच महिला तिच्या पतीशी फोनवर बोलत घरी जात होती. यावेळी महिलेचा पाठलाग करणाऱ्या आरोपीने तिचा हात पकडला. तिला रुळाच्या बाजूला असलेल्या झुडुपांमध्ये खेचून नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. ही सर्व घटना घडत असताना पीडित महिलेचा फोन सुरुच होता.

- Advertisement -

हेही वाचा – नरेंद्र मोदी, अमित शहांनी मध्य प्रदेशातील सरकार चोरले, काँग्रेस आमदारांना खरेदी केले; राहुल गांधींचा आरोप

बलात्कार झाल्यानंतर आरोपीने घडल्या प्रकाराची वाच्यता केलीस तर तुला ठार मारेन, अशी धमकी दिला. मात्र हा सगळा प्रकार या महिलेने तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने शेजाऱ्यांना बरोबर घेत घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आळा. त्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी आरोपी निशांत चव्हाणला अटक केली. निशांत चव्हाण हा खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती एसीपी मनोज पाटील यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -