घरठाणेठाण्यातील आपला दवाखाना सलाईनवर

ठाण्यातील आपला दवाखाना सलाईनवर

Subscribe

महापालिकेच्या घोळाचा परिणाम

ठाणेकर नागरिकांसह राजकीय पक्षांना आपलासा वाटू लागलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रशासकीय घोळामुळे जवळजवळ सलाईनवरच गेला आहे. जॉइन्ट व्हेंचर तत्वावर काम दिल्यावर ते काम अपेक्षितपणे सुरू होणे गरजेचे होते. मात्र त्याप्रमाणे न झाल्याने आपला दवाखाना अशक्त होत गेला. नागरिकांना दिलासा देणारा आणि सामाजिक भावनेतून राबवलेला हा उपक्रम दीड वर्षांनी मॅजिक दिल या संस्थेच्या वन रुपी क्लीनिकने हाती घेतल्यानंतर दोन महिन्यात दवाखाना सुरू करण्याचा त्यांनी धडाका लावला. त्यातच, महापालिकेच्या प्रशासकीय घोळात या कामाचे कार्यादेश निविदा प्रक्रियेत सहभागी न झालेल्या कंपनीला मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्या घोळामुळे वन रूपी क्लीनिकची फसवणूक झाल्याची बाबही पुढे येत आहे.

दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीत आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. सुरुवातीला या दवाखान्याला विरोधकांना जोरदार विरोध केला होता. पण, शिवसेने ही योजना मंजुरी करुन घेतल्याने त्यावर पुढील पाच वर्षासाठी पालिका १६० कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यातून शहरात एकूण ५० आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ठाणे महानगर पालिकेने मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शहरामध्ये ‘आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना निश्चित केली. त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार आहे.

- Advertisement -

‘आपला दवाखाना’ मुळे ठामपाला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी खासगी संस्थेला द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच विरोध वाढला होता. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५० पैकी पाच दवाखान्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु त्यानंतर दीड वर्षात एकही नवा दवाखाना संबंधित संस्थेला सुरु करता आला नव्हता. ही योजना सुरु करतांना जॉइन्ट व्हेन्चर असलेल्या आपला दवाखाना या संस्थेला या कामाचा कार्यादेश देणे अपेक्षित असताना त्या कंपनीतील एक भाग असलेल्या दुसऱ्या कंपनीलाच हे काम दिले आहे. विशेष म्हणजे ही कंपनी या निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. तरी सुध्दा त्या कंपनीला ११ जुलै २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यादेश देण्याची घोडचूक केली आहे. त्यामुळे आता जॉइन्ट व्हेन्चरमध्ये असलेल्या दुसऱ्या कंपनीने या विरोधात पालिकेला नोटीस बजावली असून १५ दिवसात याचे उत्तर द्यावे अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

तर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा सावळागोंधळ सुरू असतानाच ज्या कंपनीला कार्यादेश मिळाला आहे. त्या कंपनीला हे काम करणे शक्य नाही, याची जाणीव झाल्यावर त्या कंपनीने ४९ टक्के शेअर देत हे काम मॅजिक दिल या संस्थेच्या वन रुपी क्लिनीकला दिले आहे. त्यानुसार वन रुपी क्लिनीकने यासाठी १ कोटी ६६ लाखांचा खर्च करुन मागील दोन महिन्यांपासून शहरात तब्बल २० आपला दवाखाना सुरु केले आहेत. त्यातही रुग्णांकडून कोणत्याही स्वरुपाची फी आकारली जात नाही. परंतु केलेल्या दोन महिन्याच्या कामाचा मोबादला मिळावा यासाठी वनरुपी क्लिनीकने जेव्हा पालिकेकडे पत्रव्यवहार केला. तेव्हा त्यांच्या हा घोळ लक्षात आल्याने या मागचा कर्ता धनी कोण, असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात ठाणे महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

- Advertisement -

आम्हाला रेल्वेचा तीन वर्षांचा अनुभव आहे. जर ठाणे महापालिका प्रशासनाने आम्हाला संधी दिली तर आम्ही ठाणेकर नागरिकांसाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी बांधील आहोत. नागरिकांच्या आरोग्याची सेवा करणे हेच आमचे काम आहे.
-डॉ. राहुल घुले, संचालक वन रुपी क्लिनीक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -