घरठाणेदिवा रेल्वेस्टेशन पूर्व ते वाशी रेल्वे स्टेशन टीएमटी सेवा सुरू

दिवा रेल्वेस्टेशन पूर्व ते वाशी रेल्वे स्टेशन टीएमटी सेवा सुरू

Subscribe

२१ मार्चपासून १४१ क्रमांकाने ही नवीन बससेवा

 ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोईसाठी दिवा रेल्वे स्टेशन ते वाशी रेल्वेस्टेशन अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. नुकतेच २१ मार्चपासून १४१ क्रमांकाने ही नवीन बससेवा सुरू केली असून या सेवेचा फायदा निश्चित दिवा परिसरातील नागरिकांना होणार आहे.
 दिवा रेल्वे स्टेशनपूर्व ते वाशी रेल्वेस्टेशन या मार्गावर पहिली बस सकाळी ६.५० वाजता तर शेवटची बस २०.१५ वाजता आहे. जनतेच्या सुविधेसाठी एन.जी.रिजन्सी (बाळकूम) ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक ८३ एकूण १२ बसफेऱ्या देण्यात आल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस १० वाजता आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक (भिवंडी) मार्ग क्र.८४ वर एकूण बस फेऱ्या २० देण्यात आल्या असून या मार्गावर पहिला बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस १० वाजता आहे.
गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका)ते राजनोली नाका/ कल्याण बायपास मार्ग क्र. ८६ वर एकूण बस फेऱ्या ८ देण्यात आल्‌या असून या मार्गावर पहिली बस सकाळी ८.२० वाजता तर शेवटची बस रात्री २०.५५ वाजता आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या बससेवा सुरू करण्यात आल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्या वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी नमूद केले.
   या बससेवेचे उद्घाटन परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, शैलेश पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, सुनिता मुंडे, दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, अंकिता पाटील, सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, महिला आघाडी, शाखाप्रमुख आदी उपस्थ‍ित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -