कल्याण-डोंबिवली स्मार्टसिटी होण्याच्या दिशेने?

कल्याण-डोंबिवली १५ लाख लोकसंख्या असलेली ही जुळी शहरे. या शहरांचा २०१६ साली केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. या समावेशानतंर प्रथमच मागील काही महिन्यांपासून प्रकल्पातील कामांना चालना मिळायला सुरुवात झाली आहे

कल्याण-डोंबिवली १५ लाख लोकसंख्या असलेली ही जुळी शहरे. या शहरांचा २०१६ साली केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. या समावेशानतंर प्रथमच मागील काही महिन्यांपासून प्रकल्पातील कामांना चालना मिळायला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाहतूक व रहदारीच्या दृष्टीकोनातून मुख्य रस्त्यांवर सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्या असून, शहरातील सुरक्षितेतेच्या दृष्टीने प्रमुख रस्त्यांवर व चौकांमध्ये सीसीटूव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील उर्वरीत भागात सिग्नल व सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सिग्नल व्यवस्था व सीसीटिव्ही यंत्रणा कार्यरत राहण्याकरता महापालिकेच्या ईमारतीत नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे.

महापालिकेतील वर्दळीच्या रस्त्यावर सिंमेट क्रांकीटिकरण करण्यात आले असुन अन्य ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. स्टेशन परिसरातील गर्दी टाळण्याकरता स्मार्ट सिटीतील (४८९ कोटी रु.) महत्वाकांक्षी सॅटीस प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. त्याकरता शिघ्र हालचाली सुरु झाल्या असून कामात येणारे अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत स्टेशन परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. पार्किंग, फेरीवाले, रिक्षा वाहनस्थळांचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे. शहरांच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी महापालिकेने मुख्य चौकांमध्ये विविध प्रसंगाधारीत शोभिवंत पुतळे बसवले असून बर्याच ठिकाणी ही कामे प्रगतीपथावर आहेत. शहरातील ८० टक्के परिसरात भागात एलईडी दिवे लावण्यात आली आहेत.

महापालिकेचा गौरीपाडा येथील ११४ कोटी रुपयाची गुंतवणुक असणार्या सीटीपार्कच्या कामालाही गती मिळणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत आजतागायत २५ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. या प्रकल्पात मेडिटेशन सेंटर, सभागृह, टेनीसकोर्ट, उपहारगृह, कॅफे व अन्य सुविधांचा लाभ शहरवासीयांना मिळणार आहे. उंबर्डे येथील जैवीक कचरा प्रक्रीया प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापण प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यात येत आहे. अमृत प्रकल्पा अंतर्गत शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापण करण्यात येत आहे. नद्यातील जलप्रदुषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नदीपात्रात कचरा व रसायने सोडणार्या व्यक्ती व संस्थावर कार्यवाही करण्यात येत आहेत.

महापालिकेचा महत्वाकांक्षी रिंगरुट प्रकल्पाचे काम शिघ्रगतीने चालु असून आजपर्यंत निम्म्याहून अधिक काम झाली आहेत. भिवंडी- शिळफाटा सहापदरी सिंमेट क्रांकेटच्या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिका क्षेत्रातील कोपरीपुल, वालधुनी पुल, वडवली पुल, दुर्गाडी पुल यांची कामे पुर्णत्वास आली असून लवकरच नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतुन सुटका होणार आहे. महापालिका क्षेत्रातील महिला प्रवाशांसाठी महिला विशेष तेजस्वीनी बसेस लवकरच परिवहन मंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.

आगामी काही वर्षात मेट्रो रेल्वेसेवा, जलवाहतुक सेवा प्रकल्पही हाती घेतले जाणार आहेत. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालया मार्फत देशातील राहण्यायोग्य १२० शहरांतून १२ व्या स्थानी निवड झालेली ही जुळी शहरे येत्या काळात स्मार्ट शहरे अशी ओळख निर्माण करतील, अशी आशा नागरीक व्यक्त करत आहेत.

(रणधिर शिंदे – लेखक कल्याण प्रतिनिधी आहेत.)

हेही वाचा –

लबाड सरकार, तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र