मुंबई मेट्रो लाईन चारच्या पिलरवर गर्डरच्या कामासाठी वाहतुकीत बदल

आजपासून येत्या 23 मार्च पर्यंत

महिलांसाठीही विशेष कोच

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कासारवडवली सिग्नल ते सीएनजी पंपपर्यंत घोडबंदर रोड या परिसरात मुंबई मेट्रो लाईन 4 प्रकल्पाअंतर्गत मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 23 मार्च पर्यंत रात्रौ 23.55 वाजल्यापासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत या मार्गावरील ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त एस एस बुरसे यांनी दिली. मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणार्‍या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंदी केल्याने मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी ती वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे पुढे जातील तर मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

तसेच मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणार्‍या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे नो एण्ट्री केली असून ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. याशिवाय नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणार्‍या सर्व जड,अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत असून ती वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. याचबरोबर जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्र. 60 ते 61 वर गर्डर टाकण्याचे वेळी विहंग सोसायटी कट जवळून डावे बाजूस वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कट जवळ उजवे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्यास आणि पिलर क्र. 98 ते 100 वर गर्डर टाकण्याचे वेळी नागलाबंदर सिग्नल कट जवळ डावे बाजूस वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे इंडीयन ऑयल सीएनजी पंप कट जवळ डावे बाजूस वळण घेवून इच्छित स्थळी जातील. ही वाहतूक अधिसूचना नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सिजन गॅस वाहतूक करणारी वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उपायुक्त बुरसे यांनी स्पष्ट केले आहे.