घरठाणेभिवंडीत बेकायदेशीर रसायनाच्या ड्रमची वाहतूक

भिवंडीत बेकायदेशीर रसायनाच्या ड्रमची वाहतूक

Subscribe

गोदामाबाहेर २०० लिटरचे २६ ड्रम पोलिसांनी केले जप्त

भिवंडीमधील गोदामात गेल्या काही वर्षांपासून रासायनिक ड्रमचा साठा केला जात असून हाच साठा मोठ्या व भयानक आगीचे कारण बनले आहे. अशा रासायनिक ड्रमच्या बेकायदेशीर वाहतुकीवर अंकुश लावून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशाप्रकारे भिवंडी शहर आणि परिसरात देखील ज्वलनशील रसायनाची बेकादेशीर वाहतूक करून त्याचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सुरु असलेल्या विविध व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रासायनिक वस्तू अथवा द्रवरूपात असलेल्या सीलबंद ड्रमची वाहतूक सुरु असते. शहरात सुरु असलेल्या डाईंग व मोती कारखान्यात अशाप्रकारच्या रसायनाचा वापर होतो. त्याकरिता अनेक डाईंग,सायझिंग आणि मोती कारखाना मालकांकडे रसायने साठवणूक करण्याचा परवाना देखील नसतो. हीच वस्तुस्थिती ग्रामीण भागातील गोदामांची असून त्यामध्ये देखील विनापरवाना ज्वलनशील रासायनिक वस्तू अथवा रासायनिक द्रव्यांची साठवणूक केली जाते. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात या ठिकाणी साठविलेल्या रसायनास भयंकर आगी लागतात. या गोदामात अथवा शहरातील डाईंग,सायझिंग आणि मोती कारखान्यात हे रसायन पोहोचविण्याचे काम खाजगी वाहतूकदार करीत असून त्यांच्याकडे देखील अनेकवेळा रसायने वाहतुकीचे परवाने नसतात. त्यामुळे शहरातील मानवी जीवास धोका निर्माण असल्याने अशा प्रकारे बेकादेशीर रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पूर्णा गावातील ईताडकर कंपाऊंड मध्ये योगेश्वर वेअर हाऊस येथे मोठ्या टेम्पोमधून आलेले रसायनाचे २०० लिटर क्षमतेचे २६ प्लास्टिकचे भरलेले ड्रम जप्त केले. या रसायनाने भरलेल्या ड्रमचा माल ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या समोर राहणाऱ्या शरद हरी पवार यांनी रत्नागिरी येथील अरोमा इंटर्मीडिएटस लोटे परशुराम यांच्याकडून खरेदी केला. आणि सार्वजनिक रस्त्यावरून मोठ्या टेम्पोने चालक प्रसाद पांडे याच्या मार्फत पूर्णा येथे आणला. या साठी कोणताही शासकीय परवाने ना घेता बेकादेशीररित्या अतिज्वलनशील रसायनाची वाहतूक करून सुरक्षितता न बाळगता नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करून रसायनाची वाहतूक केल्याप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक प्रसाद पांडे आणि केमिकल ड्रेडिंग करणारे शरद हरी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून केमिकलचा ड्रम जप्त केले आहेत. मात्र आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -