घरठाणेठाण्यात दहा दुचाकींवर कोसळले झाड

ठाण्यात दहा दुचाकींवर कोसळले झाड

Subscribe

दहा दुचाकींमध्ये दोन दुचाकी एकाच मालकाच्या आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाण्याच्या गणेश वाडी, तुळजाभवानी माता मंदिराच्या बाजूला उभ्या केलेल्या तब्बल दहा दुचाकींवर झाड कोसळले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. हे झाड दहा दुचाकींवर पडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच त्या दोन्ही विभागांच्या मदतीने पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले. त्या दहा दुचाकींमध्ये दोन दुचाकी एकाच मालकाच्या आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (Tree collapse on ten bikes in thane)

हेही वाचा मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये एनडीआरएफची एकूण 10 पथके तैनात

- Advertisement -

आठवड्याभरापासून मुंबईसह नजिकच्या शहरांत तुफान पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. त्यातच, ठाण्यात सकाळी दहा दुचाकींवर झाड कोसळले. ठाण्यात पावसाळ्यात झाड उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. अनेकदा यामुळे वित्तहानीसोबतच जीवितहानीही होत असते. पावसाळ्यात धोकादायक वृक्षांची छाननी होणं गरजेचं असतानाही पालिकेकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय.

हेही वाचा – मुसळधार पावसात दरड कोसळणे, घरे व झाडांची पडझड सुरूच

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९५.७ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत.

चुनाभट्टी येथे घरांवर दरड कोसळून ३ जण जखमी

बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चुनाभट्टी येथील टेकडीलगतच्या तीन ते चार घरांवर दरड कोसळली. या घटनेत एका महिलेसह तीन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम सोनावणे (१५), प्रकाश सोनावणे (४०) आणि सुरेखा विरकर (२८/ महिला) अशी जखमींची नावे आहेत.

९ ठिकाणी घरांची पडझड

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना शहर भागात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात – २ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ५ ठिकाणी अशा ९ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सदर घटनांपैकी केवळ चुनाभट्टी येथील घटनेत तीनजण जखमी झाले आहेत.

२८ ठिकाणी झाडे/ फांद्यांची पडझड

मुंबईत मुसळधार पावसात शहर भागात – ८ ठिकाणी , पश्चिम उपनगरात १३ ठिकाणी व पूर्व उपनगरात ७ ठिकाणी अशा २८ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली आहे. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -