घरठाणेकसारा घाटात दरीत कोसळला ट्रक; सुदैवाने रेल्वेची दुर्घटना टळली

कसारा घाटात दरीत कोसळला ट्रक; सुदैवाने रेल्वेची दुर्घटना टळली

Subscribe

ट्रक तब्बल चारशे फूट खोल दरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील नागमोडी वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक पुढे जाणाऱ्या वाहनाला धडकला. त्यानंतर ट्रक तब्बल चारशे फूट खोल दरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सुदैवाने ट्रक डोंगरातून जाणा-या रेल्वे रुळावर कोसळला नाही. अन्यथा मोठा अपघात झाला असता.गुरुवारी रात्री मुंबईहून नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक कसारा घाटात भरधाव वेगात नागमोडी वळण घेत असताना चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. ट्रकने पुढे असलेल्या दुस-या ट्रकला धडक दिली आणि चारशे फूट खोल दरीत कोसळला. ही माहिती समजताच कसारा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीत पडलेल्या ट्रकमधील सचिन शिंदे याचा शोध सुरू झाला.

सकाळी पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, कसारा पोलीस अधिकारी केशव नाईक, महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, मनोज मालवा, महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरे, ए. एस. आय. सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गुजरे, सावकार, लगड, गोरे, आहेर, कसारा पोलीस ठाण्याचे रोंगटे, मेंगाळ यांनी दरीत उतरून तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ट्रकमध्ये अडकलेला मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने चारशे फूट खोल दरीतून बाहेर काढला.

- Advertisement -

रामनाथ भिकाजी उशीर असे अपघाताली मृत चालकाचे नाव आहे तर त्याचा साथीदार सचिन शिंदे हा जखमी झाला. त्याच्यावर घोटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास कसारा पोलीस करीत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाखाली असलेल्या लोहमार्गावरील हिवाळा ब्रिजवरून लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावत असतात. सुदैवाने या ब्रिजवर किंवा ब्रिजलगत असलेल्या सुरक्षा चौकीवर ट्रक कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. महामार्गावरील संरक्षक कठड्यांच्या निकृष्ठ बांधकामामुळे वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महामार्ग ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -