घरठाणेबापरे! ठाणे-घोडबंदरमधील हॉटेल सील; तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह!

बापरे! ठाणे-घोडबंदरमधील हॉटेल सील; तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना ठाण्यात एका हॉटेलमधील तब्बल २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मीरा भाईंदर पालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले आहे. मात्र एकाच हॉटेलमधील एवढे कर्मचाऱी पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Thane Hotel Staff  Tested Corona Positive)
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-घोडबंदर रोडवरील एक्सप्रेस इन हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी १८ फेब्रुवारीरोजी या हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या हॉटेलमधील अर्ध्याहून अधिक जणांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर शुक्रवारी आल्यानंतर हॉटेल मालकासह सर्वच कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली.

मीरा-भाईंदर पालिकेकडून हॉटेल्स सील

मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधील तब्बल २१ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मीरा भाईंदर पालिकेने हे हॉटेल ४ मार्चपर्यंत सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इतर कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने ही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत २६ हजार ६६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी २५ हजार ५१६ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ८०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात बाधितांचा वाढला 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ६ हजार २८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात २ हजार ५६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

असा घडला प्रकार

ठाण्यात घोडबंदर रोडवरील एक हॉटेल मीरा-भाईंदर महापालिकेने रविवारी सील केलं. या हॉटेलमध्ये काम करणारे ९१ पैकी २१ कर्मचारी करोनाबाधित आढळून आले. हॉटेलच्या व्यवस्थापनानेच खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली, त्याचे रिपोर्ट् महापालिका प्रशासनाला दिलेत. मीरा-भाईंदर महापालिकेने या परिसरात चाचणी केल्यानंतर आणखी सहाजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. तर रविवारी मीरा-भाईंदर महापालिकेने ४ मार्चपर्यंत हे हॉटेल सील केले असल्याचे सांगितले. आणखी ३८ कर्मचाऱ्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -