Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम वसुलीची सुपारी घेणाऱ्या गुंडांना शिताफीने अटक, ठाण्यातील घटना

वसुलीची सुपारी घेणाऱ्या गुंडांना शिताफीने अटक, ठाण्यातील घटना

Related Story

- Advertisement -

शेअर्स बाजारात गुंतवणूक केलेली रक्कम वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून नवी मुंबईतील एका शेअर ब्रोकरचे अपहरण केले होते. त्याच्या सुटकेसाठी पाच लाख रुपयाची खंडणी आणि प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये देण्याच्या बोलीवर शेअर ब्रोकरची सुटका करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी ही हप्त्याची रक्कम घेण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली असून त्यांचे इतर साथीदार फरार झाले आहेत. त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. ही घटना ठाणे पूर्व कोपरी येथे दोन दिवसांपूर्वीच घडली असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, नवी मुंबईत राहणारे ४० वर्षीय शेअर ब्रोकर यांचा शेअर बाजारात, क्रेडीट, ट्रेनिंग आणि गुंतवणूकचा व्यवसाय असून ठाणे पूर्व कोपरी या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे. त्यांनी नेमलेल्या एजन्टमार्फत अनेक गुंतवणूकदारानी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. गुतवणूकदारांना दरमहा परतावा त्यांच्याकडे मिळत होता. या गुंतवणूकदारांमध्ये प्रथमेश मोहिते नावाच्या व्यक्तीने सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत एकूण ९२ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याला देखील वेळचे वेळी त्याचा परतावा देण्यात आला होता. मात्र मार्च महिन्यात कोविड १९ या साथीच्या रोगामुळे लॉकडाउन लावण्यात आल्यामुळे शेअर बाजार कोसळल्यामुळे मे पासून गुंतवणूकदारांचा दरमहा मिळणारा परतावा मिळाला नाही. त्यामुळे प्रथमेश मोहिते आणि इतर काही जणांनी शेअर ब्रोकरला मे महिन्यात सानपाडा येथे बोलावून त्यांच्यात बोलणी झाली आणि शेअर बाजरातील मंदी उठल्यानंतर सर्वांचा परतावा देतो असे सांगितले होते. मात्र, प्रथमेशने मला आताच्या आता पैसे पाहिजे म्हणून शेअर ब्रोकरला धमकी दिली.

- Advertisement -

शेअर ब्रोकरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे प्रथमेशला ४० लाख पार्ट करून उर्वरित रक्कम पाच सहा महिन्यांनी देतो असे सांगून देखील २३ ऑक्टोबर रोजी किशोर आढाव, हरिंद्र कोळमकर, सुरज कलव आणि प्रतिक मुनगेकर आदी गुंड तक्रारदार शेअर ब्रोकर यांच्या ठाण्यातील कार्यालयात आले आणि त्यांनी आम्हाला प्रथमेश मोहिते यांनी पाठवले असल्याचे सांगून शेअर ब्रोकर यांच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखून धमकी देऊन रिव्हॉल्वरच्या मूठ ब्रोकरच्या खांद्यावर मारून त्याला गाडीत बसवून त्यांच्या घरी घेऊन आले. घरातून पाच लाख रुपये घेऊन त्याला काही वेळ गाडीत फिरवून दर महिन्याला २ लाख रुपये देण्याच्या अटीवर ब्रोकरला सोडून देत उद्या बाकीचे पैसे घेण्यासाठी येत असल्याचे सांगून निघून गेले.

ब्रोकरने या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ब्रोकरच्या कार्यलयाजवळ सापळा रचून हप्त्याची रक्कम घेण्यासाठी आलेल्या रोहीत कांबळे याला ताब्यत घेतले. दरम्यान पोलीस आल्याचे बघून गाडी घेऊन पळून जाणाऱ्या किशोर आढाव याचा पोलिसांनी पाठलाग करून त्यालाही अटक केली आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -