घरठाणे...आणि त्या दोन तान्हुल्यांचे जीव वाचले

…आणि त्या दोन तान्हुल्यांचे जीव वाचले

Subscribe

हजारो संकटांवर मात देत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जन्माला आलेल्या दोन चिमुरड्यांवर रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जगात येताच संकट ओढवले होते.

हजारो संकटांवर मात देत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जन्माला आलेल्या दोन चिमुरड्यांवर रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जगात येताच संकट ओढवले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना राज्य आरोग्य विभाग आणि ठाणे जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेची मिळालेली साथ वेळीच कामी आली. पण, याचदरम्यान ठाणे आरोग्य विभागावर काळे ढग दाटून आले होते. त्यातून सर्व काही व्यवस्थित होऊन त्या चिमुरड्यांचा इवलूसा जीव वाचविण्यात यश आले. मात्र या गोष्टीचा आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने कुठेही गवगवा केला नाही.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट जणू त्सुनामी बनूनच आली होती. दिवसाला ६ हजार रुग्ण ई शासकीय रुग्णालय ही फुल झाले होते. शासकीय रुग्णालयात तर चक्क रुग्णांसाठी जमिनीवर गाद्या टाकून उपचार केले जात होते. याचदरम्यान रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ठिकठिकाणी ते मिळविण्यासाठी ओरड सुरू होती. शासनासह स्थानिक पातळीवरून ऑक्सिजन मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते. जिल्हा प्रशासन खासगी रुग्णालयांना ही ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करत होते. कोणाचाही जीव ऑक्सिजनमुळे जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत होती. त्यातच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यातच राज्याच्या आरोग्य विभागाकडून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असल्याची माहिती कळवली. तसेच त्या रुग्णालयात काही तासापूर्वी दोन तान्हुल्यांनी या जगात पाऊल टाकल्याची माहिती देताना त्यांनाही ऑक्सिजनची गरज आहे, असे सांगितले.

- Advertisement -

ऑक्सिजनमुळे कोणाचा जीव जाऊ नये, असे शासनाकडून निर्देश होते. त्यातच नशीब म्हणा, की आणखी काही, त्यावेळी आपल्याकडे ऑक्सिजन साठाही उपलब्ध होता. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजनचा पुरवठा काही क्षणात त्या रुग्णालयाला करून दोन जीव वाचवू शकलो.
– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

हा प्रकार रात्रीचा असल्याने रुग्णालयाने ज्या कंपनीकडे ऑक्सिजन साठ्याची मागणी केली होती. त्यांच्याकडून ऑक्सिजन उपलब्ध होण्यास दिवस उजाडणार होता. त्यामुळे त्या तान्हुल्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करून सकाळपर्यंत पुरेल इतका ऑक्सिजन पुरवठा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. मग तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्रे फिरवली आणि ऑक्सिजन सिलेंडर पाठवण्याची व्यवस्था केली. रुग्णालयाचा ऑक्सिजन संपण्याच्या आधीच तेथे ऑक्सिजन पोहोचला आणि त्या तान्हुल्यांचे प्राण वाचविण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

नारायण राणेंच्या मित्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्य मंत्रीपदाचा दर्जा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -