Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाणे जिल्हात दोन दिवसांची पाणीकपात रद्द

ठाणे जिल्हात दोन दिवसांची पाणीकपात रद्द

जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका, आणि असंख्य खेड्या पाड्यांना मिळाला दिलासा

Related Story

- Advertisement -

राज्यात उन्हाचे चटके जाणऊ लागले आहेत. ठाण्यातदेखील तापमान वाढत आहे. अशातच आता ठाणे जिल्हा प्रशासनाने दोन दिवस केलेली पाणीकपात रद्द करत ठाणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर २०२० मध्ये ही पाणीकपात करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका, आणि असंख्य खेड्या पाड्यांना पाणीकपात रद्द केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण ठाणेकरांची पाण्याची तहान भागवणाऱ्या आंध्र, बारवी, यासारख्या प्रमुख धरणांमध्ये पाणिसाठा मुबलक प्रमाणात आहे. आणि आता पावसाळादेखील दिड ते दोन महिण्यावर आला आहे. यावर्षी सुरवातीपासून मुबलक प्रमाणात पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे आता नियमितपणे पाणीपुरवठा होणार आहे.

यामुळे जिल्हयातील तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा मंजूर पाणी कोटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली मनपाला २६४ एमएलडी, भिवंडीला २१० एमएलडी, मीरा-भाईंदरला ९ १ एमएलडी पाणी शहाड स्टेमघर व एमआयडीसीद्वारे उल्हास नदीतून मिळते. बदलापूरला ३७ , , अंबरनाथला ५५ आणि उल्हासनगरला १२० एमएलडी पाणी बारवी धरण व उल्हास नदीतून एमआयडीसी , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रोज मिळत आहे . एमआयडीला १६० एमएलडी पाणी बारवीतून मिळते . पण या धरणात आता भरपूर पाणीसाठा आहे. ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा भातसा , शहाड स्टेमघर , एमआयडीसी आणि पिसे धरणातून होतो. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून मिळणार आहे.

- Advertisement -