घरठाणेगतिरोधकांमुळे दोघांचा बळी, तीन जखमी

गतिरोधकांमुळे दोघांचा बळी, तीन जखमी

Subscribe

नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात

घोटी येथून परतत असताना नाशिक-मुंबई महामार्गावर चेरपोली हद्दीत टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. महामार्गावर गतिरोधक असल्याने कारचा वेग कमी केलेल्या वॅगनर कारला मागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने कार पुढच्या वाहनावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात कार मधील गजानन पडवळ (4०), स्वाती वरकुटे (35) ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहापुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खारेगाव, साकेत येथील पुलांच्या आणि मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याने नाशिक कडून शहापूर – किन्हवली – सरळगाव मार्गे पुढे जेएनपीटीला जाणार्‍या अवजड वाहनांसाठी नाशिक – मुंबई महामार्गावर चेरपोलीच्या उतारावर तीन ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गतिरोधक टाकल्यानंतर स्पीडलिमिट, गो-स्लो असे विविध दिशादर्शक फलक, रम्बलर रिफ्लेक्टर्स आदी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने चेरपोली येथे टाकण्यात आलेल्या या गतिरोधकांमुळे अपघात होत असल्याची ओरड वाहनचालकांकडून होत आहे.
गेल्या महिन्याभरात या गतिरोधकांमुळे आठ ते दहा अपघात झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास चेरपोली गावाच्या हद्दीतील उतारावर असलेल्या या गतिरोधकांमुळे दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. उतारावर गतिरोधक असल्याने वॅगनर चालकाने कारचा वेग कमी केला. मात्र पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहन चालकाने वॅगनर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे कार पुढच्या वाहनावर जाऊन धडकली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून कार चालक गजानन पडवळ (40) व स्वाती वरकुटे (35) ठार झाले तर जितेश वरकुटे, गोपाळ वरकुटे व सोनाबाई वरकुटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहापुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त शहापूर तालुक्यातील शेणवा येथील राहणारे आहेत. दरम्यान, शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -