घरठाणेदुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

Subscribe

दोन मोटारसायकल स्वारांची समोरासमोर जोरदार ठोकर होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शहापूर-किन्हवली मार्गावर बामणे फाटा येथे बुधवारी रात्री दहा च्या सुमारास हा अपघात घडला असून ऐन दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तकदिर मुकणे व सागर गोरे अशी मृतांची नावे आहेत. तालुक्यातील साकरवाडी (धसई) येथील तकदिर मुकणे (30) हा शहापुरहून धसई येथे बाईकवर भरधाव वेगात जात असताना समोरून येणार्‍या बाईकला जोरदार धडक दिल्याने तकदिर आणि अन्य बाईक वरील सागर गोरे (32) या दोघांचा मृत्यू झाला. तर दीपक मोरघे आणि प्रमोद विशे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शहापुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -