घरठाणेताडीचे अतिसेवन केल्याने डोंबिवलीत दोन मित्रांचा मृत्यू

ताडीचे अतिसेवन केल्याने डोंबिवलीत दोन मित्रांचा मृत्यू

Subscribe

डोंबिवली जवळील कोपर येथील एका अनधिकृत ताडीच्या दुकानात विक्री केली जाणारी ताडी प्यायल्याने दोन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. स्वप्निल चोळके (२८) आणि सचिन पाडमुख (२२) अशी मृतांची नावे आहेत.

कोपर येथे राहणारा २८ वर्षीय स्वप्नील चोळके आणि कैलास नगर येथे राहणार २२ वर्षीय सचिन पाडमुख हे दोघे मित्र होते. त्यापैकी स्वप्निल चोळके हा डोंबिवली वाहतूक शाखेत ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करायचा. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने तो गेले दोन महिने रजेवर होता. सोमवारी रात्री या दोन मित्रांनी एकत्र ताडी प्यायचा बेत केला. कोपर गाव येथील गाव मंदिराजवळ असलेल्या एका अनधिकृत ताडी विक्रीच्या दुकानात ताडी पिण्यासाठी गेले होते.

- Advertisement -

रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ताडी पिऊन घरी निघाले होते. मात्र रस्त्यातच त्या दोघांना एकाचवेळी त्रास होवून ते कोसळले. या दोघांनाही तातडीने शास्त्री नगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी ताडी विक्रेता रवी भटणे विरोधात गुन्हा दाखल केला असून ताडीचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भालेराव यांनी सांगितले.

कोपर स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि गावदेवी मंदिरा जवळ झोपडीवजा अनधिकृत दुकानात ताडी विक्री केली जात होती. त्यामुळे हा ताडीचा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरु होता ? असा सवाल आता विचारला जात आहे. या अवैद्य धंद्यांवर वेळीच कारवाई झाली असती तर दोन जणांचा नाहक जीव गेला नसता. या ताडी विक्रेत्यासोबत त्याच्या मालकाचाही घेवून त्याच्यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -