Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे केळणी येथील दोन मैत्रिणींची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

केळणी येथील दोन मैत्रिणींची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

Related Story

- Advertisement -

कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडी येथे राहणार्‍या दोन मैत्रिणींनी मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

केळणी आदिवासी वाडीत राहणार्‍या शारदा अविनाश अंबिज (१८) आणि मनिषा निरगुडे (१९) या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. मागील शुक्रवारी आम्ही रानात जातो असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. त्या परत आल्याच नाहीत. सोमवारी परिसरातील काही आदिवासी मुले जंगलातील भाज्या आणण्यासाठी गेले असता शारदा आणि मनिषा यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. हा प्रकार मुरबाड पोलिसांना समजताच ते घटनास्थळी गेले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला होता.

- Advertisement -

पोस्टमार्टेमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत विभागात उलटसुलट चर्चा होत्या. मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, यातील एक मुलगी कायम आजारी होती. तर दुसरीला घरातील कामांचा त्रास व्हायचा, याच नैराश्यातून यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -