घरठाणेठाण्यात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट

ठाण्यात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट

Subscribe

सहा झोपड्यांचे नुकसान

डोंगर वसलेल्या पत्र्यांच्या बंद असलेल्या सहा घरांमध्ये दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपार साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कळवा, घोलाई नगर पारधी पाडा येथे घडली. सुदैवाने ही घटना घडली तेंव्हा घरात कोणी नसल्याने कोणालाही जखमी झालेली नाही. या घटनेत फक्त सहा घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. तसेच या स्फोटामुळे घरावरील पत्रे उंच हवेत उडाल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

बंद घरातील गॅस सिलिंडर गळती होऊन आग लागली. त्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना समजताच ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, वन विभाग आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लागलेल्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच सुदैवाने ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी त्या घरांमधील कुटुंबातील कोणी नसल्याने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र यावेळी गगनगिरी चाळीतील एकूण ६ पत्रांच्या घरांचे पूर्ण नुकसान झाले.तसेच २-गॅस सिलिंडरचा स्फोट आणि १ गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागल्याची घटना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी बोलताना सांगितले.

- Advertisement -

निवडणुकीला गेल्याने घरात कोणी नव्हते
त्या घरातील मंडळी उत्तरप्रदेश येथील निवडणुकीसाठी गेले असल्याने ती घरे बंद होती. तसेच घरात कोणी नसल्याने गळती लक्षात आली नसल्याने ही घटना घडली. जर घरात कोणी असते तर मोठी जीवितहानी झाली असती अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -