ठाण्यात झाडाची फांदी पडल्याने दोघे जखमी; रविवारी दुपारची घोडबंदर रोडवरील घटना

Two injured after falling from tree in Thane
Two injured after falling from tree in Thane

घोडबंदर रोडवरून दुचाकीवरून चाललेल्या दोन दुचाकीस्वारांच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडल्याची घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी कासारवडवली येथील बिकानेर स्वीटस शॉप समोर घडली. यामध्ये तरंग चतुर्वेदी (३५) आणि पवन शर्मा (२२) हे दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. त्याना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

कांदिवली येथील तरंग आणि भाईंदरमधील पवन हे घोडबंदर रोडवरून आपापल्या दुचाकीने जात होते. ते कासारवडवली येथे येताच अचानक झाडाची फांदी तुटून त्यांच्या अंगावर पडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. त्या दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच पडलेली झाडाची फांदी कापून बाजूला केली. या घटनेत तरंग याच्या डोक्यावर आणि पोटाला तर पवन याच्या तोंडावर आणि मानेवर दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.