घरठाणेअज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू

अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू

Subscribe

अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्याकडून भिवंडीच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री माजीवाडा जंक्शन या ठिकाणी झाला असून कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अशरद अन्सारी (३७) आणि फिरोज अन्सारी (२६)असे अपघातात मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत.

ठाण्यातील मानपाडा येथे राहणारे दोघे एकमेकांचे नातलग असून दोघांचा जुन्या फर्निचरचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोहमद आणि फिरोज हे दोघे भिवंडीकडे जात असताना माजीवाड़ा जंक्शन घोडबंदर रोड कडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोहम्मद यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन पोबारा केला. या अपघातात दुचाकीवरून पडून दोघांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.


नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -