घरठाणेभिवंडीच्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

भिवंडीच्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Subscribe

तालुक्यात कालवार गावाच्या हद्दीतील दगड खदानीमध्ये साचलेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याच्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने भंडारी कंपाउंड मधील बालाजी नगर मध्ये हळहळ पसरली आहे.
शुभम जितेंद्र चौरसिया (१४) सत्यम पन्नीलाल चौरसिया (९वर्षे ६ महिने) असे दोन मृत अल्पवयीन मुलांची नावे असून ते दोघे नारपोली बालाजीनगर येथील यादव बिल्डिंग मध्ये राहत होते. ते मंगळवारी दुपारी २ वाजता भंडारी कंपाउंड मधील ग्लोबल हॉस्पिटल समोरील सिद्दीक सेठच्या खुल्या जागेत खेळण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही मुले घरी न आल्याने व परिसरात दिसून न आल्याने सत्यमचे वडील पन्नीलाल रामदारस चौरासिया यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन आपला मुलगा हरविल्याची फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान आज बुधवारी सकाळी रेल्वे प्रवाशांना कालवार गावाजवळील दगडाच्या खाणीतील पाण्यात दोन लहान मुलांचे मृतदेह तरंगताना दिसल्याचे रेल्वे पोलिसांना व भोईवाडा पोलिसांना सांगितले. त्यावरून भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घातली असता मंगळवारी दुपारनंतर हरविलेल्या अल्पवयीन मुलांचे मृतदेह असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडून खात्री करून ते दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदना साठी इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविले. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने बालाजीनगर परिसरात शोककळा पसरली आहे,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -