घरक्राइमदोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण : ठाणे पालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाला पाच वर्षांची शिक्षा

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण : ठाणे पालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाला पाच वर्षांची शिक्षा

Subscribe

ठाणे : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्ररकणी ठाणे महापालिकेच्या शाळेवरील सुरक्षारक्षकाला 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याशिवाय आरोपीला 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली असून त्याने दंड न भरल्यास त्याला शंभर दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशी माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली. (Two minor girls molested case Thane municipal school security guard sentenced to five years)

कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 ऑगस्ट 2016 रोजी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या शाळेवरली सुरक्षारक्षक विकास शंकर चव्हाण (35) हा आरोपी दोषी आढळून आला होता. याप्रकरणी सुनावणी करताना ठाणे अतिरिक्त जिल्हा (विशेष पोस्को) न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी सोमवारी सुरक्षारक्षकाला दोषी ठरवत 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गणेशोत्सवात जुगारबंदीचा नाशिक पॅटर्न, पिठाच्या गिरणीत ‘तीनपत्ती’

आरोपी विकास हा कोपरी गाव येथील ठाणे महानगरपालिका शाळा नं. 16 या शाळेचा सुरक्षारक्षक आहे. सध्या त्याला निलंबित करण्यात आलेले आहे. त्याने त्या शाळेत शिकणाऱ्या दहा वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर हा खटला न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

- Advertisement -

यावेळी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी 11 साक्षीदार तपासले. तसेच सुनावणी दरम्यान सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी विकास याला 5 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास शंभर दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. डी. जाधव यांनी केला तर, कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई सुशील डोके यांनी काम पाहिले.

हेही वाचा – स्पर्धा परीक्षेत पुन्हा ‘हायटेक’ कॉपी; कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या भरतीत प्रयत्न

मुलुंडमध्ये चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महिलांवर अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज मुंबईतील मुलुंड परिसरात 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून आईला जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -