माती ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यु, एक जण जखमी

नौपाडा येथील सुरू बांधकाम साईटवर मातीचा ढिगारा पडून त्याखाली तिघे अडकल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास समोर आले. यामध्ये मुंब्रा येथील हबीब बाबू शेख(४२) आणि रणजित नामक इसमाचा
मृत्यू झाला आहेत.तर  मुंब्र्यातील निर्मल रामलाल राब (४९) हे जखमी झाले आहेत. नौपाडा बी-केबीन येथे सत्य नीलियम या अंडर कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम चालू असताना बाजूचा मातीचा मोठा ढिगारा पडल्याने त्याखाली तिघे जण अडकल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाचे जवानांसह अतिक्रमण विभाग आणि नौपाडा पोलिसांनी धाव घेतली. तातडीने घटनास्थळी अडकलेल्या तिघांना बाहेर काढून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना मृत घोषित केले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.