घरठाणेराऊतांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कल्याणात गदारोळ, उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीने मिटला वाद

राऊतांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून कल्याणात गदारोळ, उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीने मिटला वाद

Subscribe

Sanjay Raut controversial statement over Doctors | विजय साळवी यांनी ही बाब उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. उद्धव ठाकरे यांनीही लागलीच डॉ.प्रशांत पाटील यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Sanjay Raut controversial statement | कल्याण – कोविडच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीतून पळ काढत होते, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आयएमएसह प्रमुख संघटनांनी संजय राऊतांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे.


कोविडच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशाप्रकारे परिस्थिती हाताळली याविषयी माहिती देताना डॉक्टर्स आणि नर्स जबाबदारीतून पळ काढत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना काम करण्यास कसं प्रोत्साहन दिलं याविषयी संजय राऊत सांगत होते. डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीतून पळ काढत होते, असं संजय राऊत यांचे वक्तव्य येताच त्यांच्या या वक्तव्याचा विविध डॉक्टर संघटनांनी निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याणातील नेते विजय साळवी यांची यासंदर्भात भेट घेत नाराजी व्यक्त केली. विजय साळवी यांनी ही बाब उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. उद्धव ठाकरे यांनीही लागलीच डॉ.प्रशांत पाटील यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊतांची ऑन कॅमेरा शिवीगाळ, नारायण राणेंबाबत बोलताना जीभ घसरली

कोरोना संसर्ग फैलावला होता तेव्हा डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी केलेल्या कामाची आठवण डॉ.प्रशांत पाटील यांनी करून दिली. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कामाला सहमती दर्शवली. राज्यातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांवर विश्वास असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून फोन करून प्रकरण मिटवल्याची माहिती डॉ.प्रशांत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – दावोसला काय करार होतात माहिती आहे, त्यापेक्षा गुजरातला जा; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -