आजादी का अमृत महोत्सवांतर्गत लसीकरण मोहीम

सोळा जुलैपासून लसीकरण मोहिमेला सुरवात

special vaccination campaign for booster dose of covid19 vaccine in india start today occasion of azadi ka amrit mahotsav

आजादी का अमृत महोत्सवांतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण 100 टक्के करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. 15 जुलैपासून देशभरात या लसीकरण मोहिमेचे 75 दिवस आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. बदलापूरमधेही ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शनिवारी 16 जुलैपासून या मोहिमेला सुरवात करण्यात येणार असून, यामध्ये पहिल्या दिवशी नागरिकांना 300 लसींचे डोस देण्यात येणारेत.

मागील वर्षी जानेवारी महिन्यात बदलापूरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर टप्याटप्याने शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मार्च 2022 मध्ये शहरातील 95 टक्के नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

मात्र यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी कोरोनाच्या बुस्टर डोसकडे पाठ फिरवली, बदलापूर शहरातील फक्त साडेतीन हजार नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे लसीकरण व्हावे हे उद्दिष्ट ठेऊन, आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारनं 15 जुलै पासून कोरोना प्रतिबंधक लसची मोहीम हाती घेतलीय. हि मोहीम 75 दिवस राबवण्यात येणार असून या मोहिमेत 18 ते 59 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने सुद्धा या मोहिमेची तयारी केली असून, शनिवार पासून पालिकेच्या कोंडिलकर हॉल इथं या मोहिमेंतर्गत नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

बदलापूरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाल्यानंतर, पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मात्र नागरिकांनी लसीचा तिसरा डोस घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. शहरात केवळ 3500 नागरिकांनी तिसरा डोस घेतला आहे. नागरिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद द्यावा

– डॉक्टर राजेश अंकुश, वैद्यकीय अधिकारी, कुबनप