घरठाणेवीस तारखेला कल्याण डोंबिवलीत लसीकरण

वीस तारखेला कल्याण डोंबिवलीत लसीकरण

Subscribe

 केडीएमसी आरोग्य विभागाची माहिती

कल्याण-डोंबिवली   महापालिका कार्यक्षेत्रात गुरुवार २० मे रोजी लसीकरण होणार आहे. येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व)  व सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व)  या दोन लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रेसाठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था आहे.

या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून  सायंकाळी  ५  वाजेपर्यंत लसीकरण व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोवॅक्सिन  लसीचा दुसरा डोस पहिल्या डोस नंतर २० दिवस पूर्ण झाल्यावर घ्यावयाचा आहे. असे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे. उर्वरित १५ लसीकरण  केंद्रांवर उद्या  कोविशिल्ड  लसीची पहिली व दुसरी मात्रा सकाळी दहा वाजल्यापासून लस साठा उपलब्ध असेपर्यंत  देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड लसीचा प्रथम डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी  ६ ते ८ आठवडयावरुन १२ ते १६ आठवडे असा केला आहे.  कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन  ८४  दिवस झाले असतील अशा नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस  मिळणार आहे. हा कालावधी पूर्ण झाला नसल्यास लस मिळणार नसून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -