घरठाणेबार्टीचा लाभ वाल्मिक समाजाला मिळायला हवा- चरणसिंग टाक

बार्टीचा लाभ वाल्मिक समाजाला मिळायला हवा- चरणसिंग टाक

Subscribe

बार्टीचा लाभ वाल्मिकी समाजाच्या मुलांना मिळत नसल्याने त्यांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप अखिल भारतीय सफाई काँग्रेस कामगार संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी उल्हासनगरात आयोजित सफाई कामगारांच्या मेळाव्यात केला. उल्हासनगर येथील रिजेन्सी हॉलमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने दादासाहेब वासुदेव चांगरे यांची जयंती निमित्त कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सफाई कामगारांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी 1972 साली डोक्यावर मैला वाहणार्‍या वाल्मिकी मेहतर समाजाच्या सफाई कामगारांसाठी लाड -पागे समिती गठीत केली होती. या समितीच्या शिफारशींना सरकारच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली. परंतु कालांतराने समितीच्या शिफारशींची अंमलाबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप या मेळाव्यात करण्यात आला.

वारस हक्कच्या नोकरीत जाती प्रामाणपत्र आणि जात पडताळणींच्या जाचक अटी, शर्थी लादल्याने वाल्मिकी समाजाच्या मुलांना वारस हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अटी शिथील कराव्यात, सफाई कामातील ठेकेदारी पद्धत पूर्ण बंद करावी, संपूर्ण राज्यात एक लाख सफाई कर्मचार्‍यांची भरती करावी, २००५ पासून लागलेली जुनी पेन्शन सर्व कामगारांना लागू व्हावी. महाराष्टू राज्य सफाई कर्मचारी आयोगावर वाल्मिकी समुदायाच्या प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात यावे, खाजगी सफाई कामगारांसाठी माथाडी बोर्डच्या धर्तीवर सफाई कर्मचारी वेलफेअर बोर्डाची स्थापना करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात मनपा आयुक्त अजीज शेख, संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ सुधाकरण दास,जयप्रकाश चांगरे प्रदेश अध्यक्ष जयसिंग कछवाह, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर उपायुक्त , अशोक नाईकवाडे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाचरण करोतिया उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -