घरठाणेमहावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण परिमंडलात विविध कार्यक्रमांचे आयोजन

महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण परिमंडलात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Subscribe
महावितरणचा १८ वा वर्धापन दिन मंगळवारी (०६ जून) साजरा होत आहे. त्यानिमित्त कल्याण परिमंडलात कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण प्रादेशिक विभाग कार्यालय, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन मंडल, स्थापत्य मंडल कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ दरम्यान कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या विविध गुणर्दशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सावित्रीबाई फुले रंग मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीस संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) आणि कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वसई मंडल कार्यालयाच्या प्रागंणात वसई मंडलाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सकाळच्या सत्रात कर्मचारी व कुटुंबियासाठी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर तर सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता संजय खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तर पालघर मंडल कार्यालयाचा कार्यक्रम बोईसर येथील वंजारी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून हास्य कलाकार संजीवन म्हात्रे तसेच सुरेल गितांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांनी सहकुटुंब या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -