घरठाणेठाण्यात महिला दिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

ठाण्यात महिला दिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

Subscribe

बाईक रॅली, संगीत संध्या, विशेष सन्मानाची धूम

महिला दिनाच्या निमित्ताने ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले – जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅली, संगीत संध्या बुधवार, ८ मार्च रोजी होणार असून महिला उद्योजकांचा विशेष सन्मान, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिला रुग्णांना फळवाटप असे अनोखे कार्यक्रम या निमित्ताने रंगणार आहेत.

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी प्रभाग क्रमांक १९ मध्ये बुधवार, ८ मार्च रोजी दिवसभर रंगणार आहे. यामध्ये सकाळी दहा वाजता ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला कर्मचार्‍यांचा विशेष सन्मान व महिला रुग्णांना फळवाटप केले जाणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता परबवाडी येथील जागृती मैदान येथून खास महिलांसाठी बाईक रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी +91 99676 02222 नम्रता भोसले – जाधव व +91 98212 42223 रुपाली विकास रेपाळे यांच्या या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केले आहे. तीन हात नाका येथील टिप टॉप येथे प्रभाग क्रमांक १९ मधील महिला उद्योजकांचा विशेष सत्कार आणि संगीतसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ६. ३० वाजता करण्यात आले आहे. मराठी व हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम यावेळी होणार असून टिपटॉप प्लाझा येथील हार्बर हॉलमध्ये हा सोहळा महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -