घरठाणेज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ठाण्यात सत्कार

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ठाण्यात सत्कार

Subscribe

सोमवारी 18 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता

ठाणे मराठी ग्रंथ संगहालय, ठाणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे स्वा वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, आणि ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी 18 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मामांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्याने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

नाट्य, चित्रपट, मालिका व लेखन प्रवासाचा लेखाजोखा उलगडणार. ’अशोक एक बहुरुपी’ या कार्यक्रमातून सुप्रसिध्द अभिनेते विघ्नेश जोशी हे अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. विनामूल्य असलेला कार्यक्रम वा अ रेगे सभागृह, पहिला मजला, मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, सुभाशचंद्र बोस मार्ग, स्टेशन रोड, ठाणे येथे पार पडणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियम पाळले जातील. तरी सर्व रसिकांनी, कला प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -