घरठाणेदक्ष नागरिकांमुळे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचा जीव बचावला

दक्ष नागरिकांमुळे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचा जीव बचावला

Subscribe

आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तेथील दक्ष नागरिकांनी गंगाधर जाधव(gangadhar jadhav) या 35 वर्षीय तरुणाला खाडीतून सुखरूप बाहेर काढले आणि जीव वाचवला.

ठाणे: कौटुंबिक भांडणामुळे पाहणे येथील खाडीत एका तरूणाने उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील (thane ) कळवा येतेच ही धक्कादायक घटना घडली. त्यामुळे तेथील भागात गंभीर वातावरण आहे. पण खाडी परिसरातील भागात काही नागरिकांच्या दक्षतेमुळे या तरुणाचा सुदैवाने जीव वाचला.

ठाणे(thane) येथील कळव्यात(kalwa) धक्कादायक घटना घडली. गंगाधर जाधव या 35 वर्षीय तरुणाने घरात भांडण झाल्यामुळे कालवा येथील खाडीत जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भांत तेथील तेथील नागरिकांनी त्वरित आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल यांना पाचारण केले. पण आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तेथील दक्ष नागरिकांनी गंगाधर जाधव(gangadhar jadhav) या 35 वर्षीय तरुणाला खाडीतून सुखरूप बाहेर काढले आणि जीव वाचवला.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘…तेव्हा दोघांच्या कामातला फरक दिसेल’; दीपक केसरकर यांची नाव न घेता ठाकरेंवर टीका

दरम्यान ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गंगाधर जाधव हा तरुण कळवा, भीम नगर येतेच राहणार आहे. काही कारणाने त्याच्या घरात कौटुंबिक भांडण झाले आणि त्या भांडणाला कंटाळून या तरूणाने खाडीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या राठोड नामक व्यक्तीने दिली. सदरची माहिती राठोड या व्यक्तीने स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. दरम्यान ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisement -

हे ही वाचा – संरक्षण भिंत पडल्यानंतर मुलुंड-ठाण्याचा रस्ता बंद

पण ही मदत मिळण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी त्यांच्या दक्षतेमुळे गंगाधर जाधवचा या तरुणाचा जीव वाचविण्यात स्थानिकांच्या प्रयत्नांना याशी मिळाले. अशी माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

हे ही वाचा – ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण काठोकाठ भरलं, पाण्याची चिंता मिटली

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -