घरठाणेप्रकल्प न हटवल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

प्रकल्प न हटवल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

बदलापूरच्या बेलवली स्मशानभूमीत ग्रीन क्रिमीयेशन प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला. याबाबतचे पत्र ग्रामस्थ आणि माजी नागरसेवकांनी पालिकेला दिले आहे. दरम्यान पालिकेने प्रकल्प स्थालंतरीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बदलापूरमधील स्मशानभूमीत ग्रीन क्रिमीयेशन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात या प्रकल्पामुळे लाकडाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. सध्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी 300 किलोपेक्षा जास्त लाकडांचा वापर होतो. हा प्रकल्प उभारल्यानंतर जवळपास 200 किलो लाकडांची बचत होऊ शकते. तसंच अंत्यसंस्कार झाल्यानंतर चिमणीतून निघणारा धूर देखील कमी होणार आहे.

बेलवली आणि मांजर्ली स्मशानभूमीत हा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. मात्र बेलवली इथे उभारलेल्या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. बेलवलीतील स्मशान भूमीत भीमनगर आणि बेलवली गावातील मृतदेहाचे दहन करण्यात येते. ग्रामस्थ जुन्या रूढी परंपरेनुसार ग्रामस्थ मृतदेहाचे दहन करतात. मात्र नव्याने उभारण्यात येणार्‍या ग्रीन क्रिमीयेशन प्रकल्पामुळे जुन्या रूढी परंपरेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येणार नाही. असं ग्रामस्थांनी म्हटलंय. सध्या स्मशान भूमीत प्रकल्पाचं काम अर्धवट अवस्थेत आहे. हा प्रकल्प अंत्यविधीच्या रॅक लगत उभारल्याने. मृतदेहाभोवती फेरे मारायला सुद्धा जागा नाही. तसेच हा प्रकल्प उभारतांना प्रशासनाने ग्रामस्थ, पोलीस पाटील, आणि माजी नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रकल्प हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून पालिकेकडे केली. हा प्रकल्प न हटवल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना विचारले असता. ग्रामस्थ आणि प्रशासनाची याबाबत चर्चा झाली आहे. या प्रकल्पात ग्रामस्थांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -