घरठाणेमार्च महिन्यांतच ग्रामीण भागात पाणी टंचाई सुरू

मार्च महिन्यांतच ग्रामीण भागात पाणी टंचाई सुरू

Subscribe

आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू

यंदा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मार्च महिन्यात पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली. मुरबाड आणि शहापूर या दोन प्रमुख तालुक्यात दरवर्षी फेब्रुवारीत पाणी टंचाई डोकेवर काढते. मात्र या वर्षी एक महिना उशीर जरी डोकेवर काढले असले तरी ही समस्या सुटण्याचे नावच घेत नसल्याचे दिसत आहे. त्या दोन्ही तालुक्यामधील १३ पाड्यांमध्ये पाणी टंचाई भासवू लागल्याने त्यांना ८ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात पाच तालुके येतात, यामध्ये शहापुर,मुरबाड,अंबरनाथ,भिवंडी आणि कल्याण या तालुक्याचा समावेश असून तेथे साधारणत: दरवर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात पाणी टंचाई डोकेवर काढताना दिसत आहे. मात्र गतवर्षी अपेक्षेपेक्षा चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे टंचाईची समस्या जवळपास एक महिना लांबणीवर गेली. त्यातच पाच तालुक्यामध्ये शहापूर आणि मुरबाड येथे पाणी टंचाईने डोकेवर काढले आहे.

- Advertisement -

त्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये एक गाव आणि दोन पाड्यांमध्ये टंचाई सुरू झाल्याने तेथे दोन टँकरद्वारे तर, शहापूर तालुक्यामधील दोन गाव आणि ११ पाड्यात टंचाई असल्याने त्या ठिकाणी ही ६ टँकरने पाणी पुरवठा केला जाऊ लागला आहे. दरवर्षी पेक्षा यंदा टंचाई उशिरा सुरू झाल्याने टंचाई कमी प्रमाणात जाणवेल मात्र तरी सुद्धा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असल्याचे ही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -