घरठाणेहॉटेल्स उद्योगातून वेडींग इंडस्ट्रीजला वगळावे

हॉटेल्स उद्योगातून वेडींग इंडस्ट्रीजला वगळावे

Subscribe

बॉम्बे केटरर्स असोसिएशनची मागणी

एप्रिल आणि मे महिन्यात आलेल्या लग्नसराईमुळे सरकारने हॉटेल्सची नियमावली वेडींग इंडस्ट्रीजला लावू नये. कारण ही इंडस्ट्रीज पूर्णपणे वेगळी असून त्यांना या नियमावलीतून सूट दयावी अशी मागणी केली. तसेच जर येत्या दोन महिन्यात व्यवसाय मिळाला नाही, तर पुढील आठ ते नऊ महिने व्यवसाय मिळणार नसल्याने या व्यवसायाशी जोडलेल्या सर्वांवर भूकमारीची वेळ येईल अशी भीती बॉम्बे केटरर्स असोसिएशनने ठाण्यात गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

सेव वेडडींग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बॉम्बे केटरर्स असोसिएशनने ‘ अब तो हमारी भी सुन लो सरकार ‘ अशी हाक दिली. करोना सारख्या साथीच्या काळात लग्न उद्योग हा एकमेव असा व्यवसाय आहे कि जिथे त्याच्या सदस्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट सरकारला मदत केली आहे. कॕटरर्सनी गरजूंना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळोवेळी खाद्यपदार्थ तयार केली आहेत तर सजावटीकरांनी प्रचंड मंडप तयार केले आहेत.

- Advertisement -

तसेच लग्न दोन कुटूंबासाठी फक्त उत्सव नाही. लाखो कुटूंबाच्या रोजगाराची ही संधी आहे. ज्यांच्याकडे निश्चित नोकरी नाही किंवा ज्यांना इतर कोणत्याही उद्योगात कोणतीही नोकरी मिळणार नाही अशा लोकांसाठी विवाहसोहळा दररोज रोजगार निर्माण करतो. विवाह हा केवळ उत्सव नसतो, तर असा उद्योग आहे जो जास्तीत जास्त रोजगार आणि व्यवसाय प्रदान करतो. तर फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील निर्बंधामुळे, विवाहसोहळा संपुर्ण महाराष्ट्रा बाहेरील ठिकाणी स्थलांतरीत झाला आणि फेब्रुवारी नंतर महारा्ष्ट्रातील कोविड प्रकरणात वाढ झाल्याने विवाहसोहळा इतर राज्यांमध्ये स्थलांतरीत झाला आहे, याचा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण मुंबईतील विवाह उद्योगावर विपरीत परिणाम झाला असे ही या बॉम्बे केटरर्स असोसिएशनचे ललित जैन यांनी सांगितले. पुढे बोलताना,विवाहसोहळ्यामुळे विषाणूचा फैलाव होण्याचा एक मोठा गैरसमज आहे जो योग्य नाही. तार्किकदृष्ट्या सध्याच्या काळात रेस्टॉरंटसारख्या उद्योगांना १००% क्षमतेने ओपरेट करण्याची परवानगी आहे.

तर हॉटेल आणि रिसॉर्ट्स ज्यामध्ये लग्न आणि पर्यटन आहे त्यांना १००% क्षमतेसह ओपरेट करण्याची परवानगी आहे. त्याचप्रमाणे बसेस आणि ट्रेन लोकांच्या एकाधीक फिरण्याने गर्दी करतात आणि त्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे सॕनिटायझेशन केले जात नाही, मग लोकांची संख्या केवळ विवाहसोहळ्यांमध्येच का प्रतिबंध आहे. जेथे दोन कार्यक्रमात नेहमीच सॕनीटायझेशन होते आणि पाहुण्यांचा तपशील अगदी सहजपणे राखला जाऊ शकतो आणि इतर उद्योगांच्या तुलनेत विषाणूचा प्रसार होण्यॎाची शक्यता तार्किक आणि प्रत्यक्षात खुपच कमी आहे.

- Advertisement -

त्यातच असोसिएशनने एकमेव मागणी ठिकाण्याच्या आकारानुसार पाहुण्यांच्या संख्येसह इतर उद्योगांसारखी कार्य करण्याची परवानगी देण्यासाठी अगदी तार्किक आहे. प्रति व्यक्ती २५ चौरस फुट विचार करा आणि त्यानुसार अतिथींची एकूण संख्या वाढवा. इंडस्ट्रीजशी इतर उद्योगांप्रमाणे समान वागणूक द्यावी आणि पक्षपाती होऊ नये. असेही म्हटले आहे. आम्हाला फक्त काम करण्यासाठी आणि आपले जिवन निर्वाह करण्याची परवानगी हवी आहे. या लग्नाच्या उद्योगाच्या पुनरुज्जीवनामुळे अर्थव्यवस्थेत त्वरीत चालना मिळेल कारण इतर विविध उद्योग या इंडस्ट्रीजवर अवलंबून आहेत. मागील वर्षाचा गर्मीचा सिझन तसेच ह्यावर्षीचा हिवाळ्यातील कार्यक्रमांचा लग्नाचा उद्योग गमावला आहे . आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की शासनाने लवकरात लवकर या उद्योगासाठी एक वेगळा नियम तयार करावा.असे म्हटले आहे. तसेच आम्ही सरकारसोबत आहोत. आम्ही कोणतेही आंदोलन करणार नसल्याचे ही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -