ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणार्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम 21 ते 24 फेब्रुवारी या काळात हाती घेतले आहे. त्यामुळे शहराला स्वत:च्या योजनेतून 50 टक्के पाणी कपात केली आहे. त्यातच महापालिकेच्या पूर्वेकडील सॅटीसचे पायलींग करण्यासाठी खोदकाम सुरु असतांना तीन हात नाका येथील सर्व्हिस रोड मंगळवारी रात्री जलवाहिनी फुटली. चोविरुम्स होऊनही त्या जलवाहिनीकडे अद्यापही कोणत्याही शासकीय यंत्रणेचे लक्ष गेले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे ती फुटलेली जलवाहिनी ठाणे किंवा मुंबई याचा तपास केला जात असल्याने लाखो लीटर पाणी गटारात वाहून गेले आहे.
तीन हात नाका येथील सर्व्हिस रोडवर सॅटीससाठी पायलिंगचे काम जोरात सुरू आहे. याचदरम्यान काम करणार्या यंत्रणेकडून मंगळवारी रात्री जलवाहीनी फुटली गेली आहे. एकीकडे सलग चार दिवस पाणी कपात केली असताना दुसरीकडे या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधित यंत्रणेचे कर्मचारी व अधिकार्यांना जलवाहिनी नेमकी किती मोठी आहे .तसेच ती ठाणे की मुंबई महापालिकेची आहे हे दोन्ही यंत्रणांना माहित नसल्याचे दिसून आले आहे. येथे काम करणार्या यंत्रणेने दोन दिवसात पाणी थांबविण्यासाठी तब्बल 4 गाड्या आरएमसी टाकून सुध्दा प्रवाह थांबलेला नाही. ठाणे शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करताना अशा सर्व कामांचे नियोजन देखील जबाबदार अधिकार्यांच्या देखरेखीखाली स्मार्ट पद्धतीने केले जाणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याचा नाहक त्रास नागरीकांना झाला नसता. तसेच लाखो लिटर पाण्याची नासाडी टळली असती. त्यामूळे ठामपा आयुक्तांनी तत्काळ या गोष्टीची दखल घेत याला जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे.