घर ठाणे महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयात उशिरापर्यंत थांबणारे कोण?

महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयात उशिरापर्यंत थांबणारे कोण?

Subscribe

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सुरु असलेल्या बेशिस्त कारभारांवर आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना भेटणार्‍या अभ्यांगतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवण्यात बाबतच्या सूचना सर्व नियंत्रण अधिकारी आणि विभाग प्रमुख देण्यात आलेल्या आहेत. तरीही काही अभ्यांगत हे महानगरपालिका मुख्यालयात आणि प्रभाग कार्यालयात सकाळी 10.00 ते सायंकाळी उशिरापर्यंत थांबत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे हे उशिरापर्यंत थांबणारे अभ्यांगत कोण? असा प्रश्न सर्वसामान्य शहरवासीयांना पडला असून याचा शोध पालिका प्रशासनाने घेतला पाहिजे,अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

शासन परिपत्रकानुसार अभ्यंगतासाठी भेटीची वेळ दुपारी 3 ते 5 निश्चित करण्यात आली असताना देखील काही नागरिक हे मुख्यालयात आणि प्रभाग कार्यालयात फिरत असतात. यामुळे कार्यालयीन कामकाजात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे पालिका सुरक्षा कर्मचार्‍यामार्फत सायंकाळी 5.30 नंतर सर्व मुख्यालयाची पाहणी करुन नागरिक आढळल्यास त्याबाबत विभाग प्रमुखांना विचारुन त्यांची आवश्यकता आहे किंवा कसे? याची पडतळणी करण्यात येणार आहे. तसेच योग्य कारणांशिवाय सायंकाळी 5.30 नंतर कोणत्याही नागरिकांस मुख्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही. जर अत्यंत तातडीचे काम असल्यास त्याबाबत संबंधित विभाग प्रमुखांकडून खातर जमा करुनच त्यांना प्रवेश देण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सर्व विभाग प्रमुख सर्व नियंत्रण अधिकारी तसेच सुरक्षा विभाग यांना दिले आहेत.

- Advertisement -

कार्यालयीन वेळेत कर्मचारी गायब
वास्तविक कार्यालयीन वेळेत काही अधिकारी आणि कर्मचारी एक-दोन तास गायब असतात. तर अनेक वेळा कार्यालयीन मिटींगच्या वेळा देखील अभ्यांगतांच्या वेळेस आयोजित केल्याने दैनंदिन काम-व्यवसाय सोडून आलेल्या अभ्यागतांना अधिकार्‍यांची भेट मिळत नाही. तसेच काही अधिकारी-कर्मचारी कामाचा निपटारा वेळेत न करता दिरंगाई करीत असल्याने शहरातील अनेक करदात्यांना विनाकारण कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत असल्याने,करदात्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही अधिकारी मुख्य कार्यालयात सायंकाळपासून काम करीत असल्याने रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरु असते आणि असे अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना अथवा माजी नगरसेवकांना कार्यालयात बोलावीत असताना दिसून येतात, असा आरोप देखील अनेकवेळा नागरिकांकडून झाला आहे. त्यामुळे अशा बेशिस्त अधिकार्‍यांना शिस्तीचा अंकुश आयुक्तांनी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -