घरठाणेमुंबई तोडणार बोलून जो कोणी मत मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो यशस्वी होणार...

मुंबई तोडणार बोलून जो कोणी मत मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो यशस्वी होणार नाही- शिंदे

Subscribe

काही लोक म्हणतात , निवडणूक आल्या कि मुंबई तोडणार, मुंबई तोडणार … अरे कोण तोडणार मुंबई ? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही हे स्वप्न कोणी पाहू नये पण मुंबई तोडणार बोलून जो कोणी मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यात ते यशस्वी होणार नाहीत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात एका कार्यक्रमात नाव न घेतला उद्धव ठाकरे यांना मारला. दरम्यान कळवा – खारेगाव – पारसिक नगर साठी १०४ कोटी रुपये दिले  असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले .  एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा मुख्यमंत्री आहे. वर्षा आता सगळ्यांना खुले आहे कधी आपण वर्षावर या , मंत्रालयात , ठाण्यात भेटीला या . माझे काही नाही आपल्या हक्काचे आहे त्यामुळे आपण कधीही माझी भेट घेऊ शकता असे आवाहन शिंदे यांनी केले.

सोमवरी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पारसिक नगर येथील ९० फूट रस्ता येथे मराठी बाणा कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्याप्रसंगी संबोधताना त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन राज्यासाठी आपण काम करतो. ते  आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी करतो आहे  . आज काही लोक म्हणाले , शेतकऱ्यांना काय दिले ? गेल्या आठ महिन्यात शेतकऱ्यांना साडे बारा हजार कोटी रुपये दिले.एसटी मध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली  त्यामुळे एसटी फुल होऊ लागल्या. ७५ वयाच्या वरील लोकांना मोफत प्रवास केला. ८ कोटी पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटी प्रवासाचा लाभ घेतला. ज्यांना पोटदुखी होते त्यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे अशी कोपरखळी देखील शिंदे यांनी मारली. तसेच या कार्यक्रमाला झालेली रेकॉर्डब्रेक गर्दी ही गाड्या पाठवून जमवलेली गर्दी नाही अशी पुष्टी देखील शिंदे यांनी जोडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -