घरठाणेठाण्यातील रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांनाच वारंवार मुदतवाढ का?; कॉंग्रेसचा सवाल

ठाण्यातील रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांनाच वारंवार मुदतवाढ का?; कॉंग्रेसचा सवाल

Subscribe

वारंवार मुदतवाढ देऊन नंतर पावसाच्या तोंडावर संबंधित निविदा रद्द करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे

ठाणे महापालिका हद्दीतील अति अत्यावश्यक असलेल्या २३ गटाच्या दैनंदिन रस्ते सफाईच्या ऑनलाइन निविदांमध्ये वारंवार मुदतवाढ दिली जात आहे . परंतु दुसरीकडे इतर निविदेंना मुदतवाढ दिली जात नाही . त्यामुळे आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच ही निविदा मिळावी म्हणून ही मुदतवाढ दिली जात आहे का ? असा सवाल काँग्रेसचे सदस्य संजय घाडीगावकर यांनी महापलिका आयुक्त डॉ . विपीन शर्मा यांना केलेल्या पत्रव्यवहारात उपस्थित केला आहे . तसेच या मागचे कारण काय , त्याचे उत्तर मिळावे अशी मागणी करताना दैनंदिन रस्ते सफाईच्या २३ गटांच्या निविदांना दिलेली मुदतवाढ तातडीने रद्द करून ऑनलाइन निविदा तात्काळ मागवून सात दिवसात उघडण्याबाबत त्याअनुषंगाने कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी कडक लेखी आदेश देण्यात यावेत.

अशीमागणी त्यांनी केली आहे . महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असल्याचे कारण देत या निविदेला २ वेळा मुदतावढ देऊन पुन्हा १८ मे २०२१ र्पयत मुदतवाढ देण्यात आली आहे . परंतु ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तदनंतर काँग्रेसचा सवाल काढलेल्या नाले सफाईच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . अशाच प्रकारे ठाणो महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या इतर निविदा , पाणी पुरवठा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायवाट गटारा च्या निविदा , आरोग्य विभागाच्या कोवीड १ ९ उपाययोजना बाबत निविदा , उद्यान विभाग निगा देखभाल यांच्या निविदा प्रकिया कशा पूर्ण केल्या जात आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे . तसेच नवीन निविदा प्रसिद्धिस आलेल्या आहेत .

- Advertisement -

वास्तविक कोवीड १ ९ लाटेत दैनंदिन रस्ते सफाई अत्यंत महत्वपूर्ण असताना उपरोक्त निविदाना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे या मागील मुख्य कारण काही भ्रष्ट ठाणे महापालिका अधिकारी आणि रस्ते सफाई मधील काही विशेष ठेकेदार यांची नेहमीप्रमाणो अभद्र युती झालेली आहे का ? वारंवार मुदतवाढ देऊन नंतर पावसाच्या तोंडावर संबंधित निविदा रद्द करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे . केवळ आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देता यावे यासाठी महापालिकेतील काही अधिकारी यासाठी काम करीत असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे . त्याच कारणासाठी या अति महत्वपूर्ण दैनंदिन रस्ते सफाईच्या २३ निविदांना काही विशिष्ट ठेकेदारांच्या फायद्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय अभद्र युती करून अशाप्रकारे अनियमतिता घडवून मुदत वाढ देण्याचा घाट चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -