Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे सहाय्यक आयुक्तांवर कारवाईसाठी ज्योतिषी मुहूर्त काढणार का?

सहाय्यक आयुक्तांवर कारवाईसाठी ज्योतिषी मुहूर्त काढणार का?

Subscribe

संजय घाडीगांवकर यांचा सवाल

पुरावे देऊन ही ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामाच्या इमारतीना संरक्षण देणारे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, समीर जाधव आणि विद्यमान ठाणेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार कधी असा सवाल उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केला आहे. तसेच त्या कारवायीसाठी कोणता ज्योतिषी मुहूर्त काढणार ? असे म्हटले आहे. तर एखादी दुर्घटना घडल्यास आपणास जबाबदार धरून न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी इ-मेलद्वारे केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले आहे. कळवा येथील अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका आयुक्त बांगर यांनी सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

त्या नोटिसचा आधार घेत, घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह महापालिका आयुक्तांना ईमेल द्वारे पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आयुक्तांना आपणास अनधिकृत बांधकामांबाबत लेखी पत्राद्वारे आणि समक्ष भेटून देखील पुरावे दिलेले आहे. असे म्हटले आहे. पण आज तोपर्यंत राज्याच्या नगर विकास विभागाने वाट पाहत ठाणे महापालिकेच्या महापालिका आयुक्ताने उपरोक्त विषयाबाबत सबंधित सहाय्यक आयुक्त यांना निलंबित केलेले नाही, याचे स्पष्टीकरण देण्याची हिंमतही शासनाकडे नाही म्हणजेच प्रशासन राज्य शासन हे या अनधिकृत इमारतीच्या मलिदामध्ये लाभार्थी आहेत का ? असा आरोप करत सवाल उपस्थित केला आहे. तर राज्य शासनावर व प्रशासनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा त्यांच्या पक्षाचा राजकीय दबाव आहे म्हणूनच या अधिकार्‍यांना वाचवलं जात आहे असा सवाल केला आहे. जर आयुक्तांवर राजकीय दबावही नाही आणि आपण लाभार्थी ही नाही मग या सहाय्यक आयुक्तांना आपण आजपर्यंत निलंबित का केलेले नाही वा तसे आदेशही काढलेले का नाही याचा खुलासा करावा, ते करायची हिंमत कधी दाखवणार का? भीती वाटत असेल तर तसेही स्पष्ट करावे असे म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान अतिक्रमण मुख्यालयातून उच्च न्यायालयाच्या अहवालाची फाईल गायब होते अनाधिकृत इमारतींवर कारवाईच होत नाही फक्त कागदावर कारवाई दाखवली जाते याचा अर्थ काय घ्यायचा. किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, जर आपण तात्काळ कारवाई न केल्यास उद्या भविष्यात कोणतीही दुर्घटना घडली तर आपणास याबाबत जबाबदार धरून आपल्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी मी स्वतः न्यायालयामध्ये याचिका करीन आणि प्रधान सचिव 2 नगर विकास विभाग ,आणि ठाणे महापालिका आयुक्त कार्यालय यांनी कशी दिरंगाई केली हे कागदोपत्री सिद्धच होईल असा दावा ही केला आहे. त्यामुळे होणार्‍या सर्व परिणामाची जबाबदारी आपली आणि फक्त आपली असेल याची नोंद घ्यावी? असेही शेवटी घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -