अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणा-या महिलेला उल्हासनगरातून अटक

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघांनी हा त्याच्या मुलीच्या अनिक्षा हिच्यामार्फत थेट राज्याच्या गृहमंत्री यांच्या घरापर्यंत पोहचतो आणि त्याची मुलगी गृहमंत्र्यांच्या पत्नीला एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करते आणि नंतर ब्लॅकमेल करण्याचा कट करते, हा सर्व प्रकार घडत असताना उल्हासनगर पोलिसांना अनिल जयसिंगानी कोण आहे, याची माहिती नसावी, या धक्कादायक प्रकाराने उल्हासनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मलबार हिल पोलिसांनी उल्हासनगरमधील मायापुरी अपार्टमेंटमधून अनिक्षा आणि तिचा भाऊ अक्षन यांना ताब्यात घेतले आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट सट्ट्याचा धंदा करणारा अनिल जयसिंगानी हा गेली आठ वर्षांपासून मुंबई, गोवा, मध्यप्रदेश गुजरात, उल्हासनगरमधील विविध गुन्ह्यात फरार आहे. त्याच्यावर बेटींग, जुगार, जमीन हडपणे, मारामारी असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

तर त्याची मुलगी अनिक्षाने ड्रेस डिझानायरचा कोर्स केलेला आहे. ती कपडे, दागिने, फुटवेअरची डिझायनींग करते. मुंबईतील एका कार्यक्रमात तिची ओळख अमृता फडणवीस यांच्याशी 2021 मध्ये झाली. तिने डिझायन केलेले ड्रेस आणि दागिने परिधान करण्यासाठी ती अमृता फडणवीस यांच्याकडे आग्रह करू लागली. तिने अमृता फडवणीस यांचा विश्वास संपादन केला. तिला क्रिकेट बुकींची माहिती असल्याचे तिने अमृता फडणवीस यांना सांगितल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर कारवाई केल्यास कोट्यवधींची कमाई होऊ शकते असे बेकायदा काम तिने सुचवले. त्यामुळे अमृता फडणवीस आश्चर्यचकीत झाल्या आणि त्यांनी तिच्यापासून लांब राहाणे पसंत केले.

मात्र त्यानंतरही अनिक्षा हिने पुन्हा अमृता फडणवीस यांना भेटून तिचा वडिलांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले असून त्यांना या सर्व प्रकरणातून क्लीन चिट मिळून द्या, यासाठी एक कोटी रुपये देण्याचा बेकायदा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून अमृता फडणवीस यांना धक्का बसला. त्यांनी तिला हाकलून लावले, तिचा नंबर ब्लाॅक केला. मात्र अनोळखी नंबरवरून तिने पुन्हा अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच अनिक्षाच्या वडिलांनी म्हणजेच अनिल जयसिंघानी याने अमृता यांना अडचणीत आणण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली, ही माहिती अमृता फडणवीस यांनी पोलिसांना तक्रारीत सांगितल्याची माहिती आहे.