…तर महिलांनी काही घातलं नाही तरी छान दिसतात, रामदेव बाबा बरळले

साडीमध्ये महिल्या चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं आहे.

ठाणे – महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नव्हे तर, अमृता फडणवीस १०० वर्षे तरुण राहतील, असंही ते म्हणाले. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्या शंभर वर्षांपर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, त्या नेहमीच तोलून मापून खातात. खुश राहतात. जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, असं रामदेव बाबा म्हणाले.

साडीमध्ये महिल्या चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं आहे.