घरठाणेपोलीस बंदोबस्तात ठाणे पालिकेचे भांडर्ली येथे काम सुरू

पोलीस बंदोबस्तात ठाणे पालिकेचे भांडर्ली येथे काम सुरू

Subscribe

स्थानिकांची फलकाद्वारे ठिय्या आंदोलनात घोषणा बाजी

भांडर्लीच्या जागेचा करार झाल्यानंतर या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला पुन्हा एकदा १४ गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. विरोध होणार हे आधीच लक्षात आल्याने मुख्य रस्त्यापासून प्रत्यक्षात जागेपर्यंत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनकर्त्या स्थानिकांना मुख्य रस्त्यावरच पोलिसांनी अडवून ठेवले होते. हातात विरोधाचे फलक घेऊन ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

भंडार्ली गावची जागा ठाणे महापालिकेने डम्पिंग साठी भाडेतत्त्वावर घेतली आहे.या डम्पिंगला १४ गावातील जनतेने विरोध केला आहे.मात्र अस असलं तरी ग्रामस्थांसोबत बैठका मनपा घेत आहे.सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त घेत महापालिकेने काम सुरू केलं होत. सकाळच्या सुमारास राज्य राखीव दलाच्या जवानांसह दंगल नियंत्रण पथक घेऊन महापालिकेचे अधिकारी भंडार्ली गावच्या डोंगरावर पोहचले. सध्या या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. महापालिकेचे पथक गावात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिक हे भंडार्ली गावच्या वेशीवर एकत्र आले.

- Advertisement -

मात्र एकही ग्रामस्थ डम्पिंग जागी जाणार नाही याची विशेष काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांनी बँरेकेटिंग करून ठेवली होती. ठाणे रायगड जिल्ह्याची सीमा असलेला जुना पनवेल – मुंब्रा हा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी सुरू होता. मात्र पोलोसांची अतिरिक्त कुमक हि ग्रामस्थांना गावाच्या वेशिवरच अडवून ठेवल्याने ग्रामस्थ देखील हतबल झाले होते. अखेर १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना घेऊन पोलीस कडेकोट बंदोबस्त घेऊन ठाणे महापालिकेचे अधिकारी जागेवर पोहचले होते. सर्व पक्षीय विकास समितीने काम बंद करण्याचा हट्टहास धरला होता. मात्र अधिकारी काम सुरू ठेवण्यावर ठाम असल्याने विकास समितीचे पदाधिकारी हे जागेवरच ठान मांडून बसले होते. मात्र पोलिसांनी विकास समितीची समजूत करत आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून उठवले.

” ठाणे महानगरपालिकेच्या वतीने येथे डम्पिंग चे काम सूरु झालेले नाही, तर शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीचे बेसिक काम सुरू झाले आहे. बैठकीमध्ये ग्रामस्थांना जी आश्वासन दिली त्यानुसारच काम केले जात आहे. साईड सीलेक्शन कमिटीची यासाठी एनओसी आहे. ग्रामस्थांचा विरोध असणे स्वाभाविक आहे त्याचा विचार केला जाईल.”
– मनीष जोशी, उपायुक्त ठामपा.

- Advertisement -

“आमचं आयुष्य गेलं पण आमच्या मुलांच्या भविष्याच काय ? डम्पिंग ग्राउंड मुळे अनेक आजार आणि रोगराई पसरू शकते.आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येईल,त्यामुळे आम्हाला इथे डम्पिंग नकोच.रासायनिक गोदामांमुळे आधीच प्रदूषण वाढलं असताना त्यात ही भर कशाला ?
– वैशाली गायकर, आंदोलक महिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -