घरटेक-वेकजरा जपून, 'या' पासवर्डवर हॅकर्सची नजर

जरा जपून, ‘या’ पासवर्डवर हॅकर्सची नजर

Subscribe

तुम्ही जर का 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर सावधान राहा. तुमचे हे पासवर्ड हॅकर्स सहज हॅक करु शकतात.

‘पासवर्ड’ हा आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात खूप महत्वाचा बनला आहे. आजकाल सर्वच आपल्या बँक अकाउंटपासून ते अगदी मोबाईलपर्यंची माहिती सुरक्षित राहावी यासाठी पासवर्ड सेट करतात. इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाईन व्यवहार याचं जाळं जसं वाढतंय, तसंच दुसरीकडे ऑनलाईन डेटा हॅक करणाऱ्या ‘हॅकर्स’चं प्रमाणाही वाढलं आहे. उपलब्ध डेटानुसार २०१८ या संपूर्ण वर्षात काही ठराविक पासवर्ड सर्वात जास्त हॅक झाले आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म स्प्लैशडेटाने हा डेटा समोर आणला आहे. हॅक करण्यात आलेल्या पासवर्डच्या यादीमध्ये ‘123456’ हा सर्वात टॉपवर आहे. तर ‘Password’ हा पासवर्ड दुसऱ्या नंबरवर आहे. हे दोन्ही पासवर्ड सलग ५ वर्षांपासून हॅकर्सचे आवडते पासवर्ड आहेत. खरंतर सिक्युरिटी रिसर्चर्स पासवर्ड सेट करतेवेळी ग्राहकांना पासवर्डसंदर्भात सातत्याने चेतावनी देत असतात. ‘तुमचा पासवर्ड जरा कठीण असुद्या किंवा हा पासवर्ड सहज कुणीही ओळखू शकतो – पासवर्ड बदला’, असा संदेश देत असतात. मात्र, तरीही जगभरातील लाखो लोक हॅकर्स सहजतेने हॅक करू शकतील असे पासवर्ड ठेवत आहेत.

सायबर सिक्युरिटी फर्म स्प्लैशडेटाने जारी केलेला हा डेटा हॅक झालेल्या ५० लाख अकाउंट्सवर आधारित आहे. त्यांनी २०१८ च्या सर्वात वाईट २५ पासवर्डची यादी जाहीर केली आहे.

- Advertisement -

‘हे’ आहेत हॅकर्सचे आवडते पासवर्ड

  • 123456
  • password
  • 123456789
  • 12345678
  • 12345
  • 111111
  • 1234567
  • sunshine
  • qwerty
  • iloveyou
  • princess
  • admin
  • welcome
  • 666666
  • abc123
  • football
  • 123123
  • monkey
  • 654321
  • !@#$%^&*
  • charlie
  • aa123456
  • donald
  • password1
  • qwerty123

सायबर सिक्युरिटी फर्म स्प्लैशडेटाच्या म्हणण्यानुसार, २०१८ या एका वर्षात जगभरात १० टक्के लोकांनी या वाईट पासवर्डमधून एकाचा वापर केला आहे. स्प्लैशडेटा सहजतेने हॅक होणाऱ्या पासवर्डची यादी तयार करण्यासाठी लाखाहून अधिक पासवर्डचे आकलन करते. त्यामुळे सावधान व्हा आणि तुम्ही दर यापैकी एखादा पासवर्ड सेट करण्याच्या विचारात असाल, तर तो विचार सोडून द्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -