घरट्रेंडिंगकविता उलघडणार डोंगरात दडलेल्या १८ किलो सोन्याचे रहस्य

कविता उलघडणार डोंगरात दडलेल्या १८ किलो सोन्याचे रहस्य

Subscribe

दुर्गम डोंगराळ भागात सोन्याचा खजिना लपवल्याचा दावा एका अमेरिकेतील व्यावसायिकाने केला आहे. त्यामुळे या सोन्याचा खजिना मिळवण्याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या ८५ वर्षीय अमेरिकन व्यावसायिकाने डोंगराळ भागात लपवलेले सोने शोधण्यासाठी १००० वर्षे लागतील असा संकेत एका कवितेतून दिली आहे. त्यामुळे सोन्याच्या खजिन्याविषयी उत्सुकता वाढली आहे. फॉरेस्ट फेना या व्यक्तीने लपविलेले सोने शोधण्यासाठी आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले असल्याचे सांगितले जात आहे.य

या खजिन्याच्या रहस्याबाबत अनेक अहवाल आत्तापर्यंत पुढे आले आहेत. यातील एका अहवालाबाबत सांगताना मिस्टर फेन्न यांनी सांगितले की, या व्यक्तीने डोंगराळ प्रदेशात १८ किलो सोने लपवले आहे. ३ हजार मैलांवर डोंगराळ भागात लपवले आहे. या सोन्याच्या खजिन्याच्या रहस्य उलघडा करण्यासाठी एक नकाशा आणि एक कविता देखील प्रकाशित केली आहे. परंतु या आधारे १००० वर्षे शोध घेण्यासाठी लागतीस असा दावा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये या खजिन्याच्या शोधात गेलेल्या ४ लोकांचा मृत्यू झाला. आजपर्यंत सोन्याच्या शोधात गेल्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या सोन्याची खजिन्याची किंमत आत्ताच्या घडीला १४, ५१ कोटी असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

या सोन्याच्या खजिन्याविषयी सांगणारे मिस्टर फेन्ना हे अमेरिकन हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर ते एक आर्ट गॅलरी चालवत आहेत. मेक्सिकोच्या सांता फे येथे एक आर्ट गॅलरी चालवणारे मिस्टर फेन्न यांच्याकडे 70 आणि 80 च्या दशकात बरेच सेलिब्रिटी येत होते. या खजिन्याविषयी जाणून घेण्यासाठी दररोज हजारो मेल येता असे ते सांगतात. याविषयी अधिक सांगताना ते म्हणाले. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख लोकांनी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एक दिवस त्य़ांना कर्करोग होतो. त्यामुळे आपल्या अंतिम श्वासानंतर या खजिन्यातील रहस्ये त्यांच्याबरोबर पुरली जातील. असे वाटले. परंतु योग्य उपचार घेतल्यानंतर त्यांनी कर्करोगावर मात केली.

स्वत:बद्दल लिहिताना त्यांनी या खजिन्याची माहिती दिली आहे. या खजिन्यासह २४ ओळींची कविताही लिहिली आहे. या कवितेचे शीर्षक द थ्रील ऑफ द चेंज आहे. अनेक माध्यामांत या सोन्याच्या खजिन्याची बातम्या छापून आल्या. त्यामुळे या खजिन्याची लोकप्रियता वाढत गेली. या खजिन्याविषयी फेन्ना सांगतात. त्यांनी हे आव्हान सर्वांसमोर उभे केले कारण लोक यानिमित्ताने घराबाहेर पडतील. घरापेक्षा जास्त वेळ लोकांनी घराबाहेर घालवावा अशी माझी इच्छा आहे. यामुळे बरीच लोक घराबाहेर पडत आपल्या पालकांसह डोंगर दऱ्या, कॅम्पिंग आणि हायकिंगचा आनंद घेतील. असे ते म्हणाले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -